‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुले याच्याशी शिवानीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांचा सुखद धक्का बसला होता. पण साखरपुडा होताच शिवानी पुन्हा कामाला लागली आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिलला शिवानी सोनारचा साखरपुडा झाला. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला. “अलेक्सा प्लीज प्ले, एक दिन आप यूं हमको मिल जायेंगे. #Ambani”, असं कॅप्शन लिहित शिवानीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा – Video: “बॉयकॉट एपी ढिल्लों…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने स्टेजवर आपटून फोडली गिटार, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले…

आता साखरपुड्याला सहा-सात दिवस उलडताच शिवानी कामाला लागली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या नव्या शोमधील काही बीटीएस.” या व्हिडीओमध्ये शिवानीच्या हातावर मेहंदी, अंगठी पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवानी ‘झी टॉकीज’ वाहिनीवरील ‘मन मंदिरा गजर भक्तीचा’ या कार्यक्रमात झळकणार आहे. या कार्यक्रमात ती निवेदन करताना दिसणार आहे.

हेही वाचा – Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत

शिवानीच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “झकास”, “ऑल द बेस्ट”, “क्या बात है”, “तुला नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी शिवानीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani sonar will be seen in man mandira gajar bhakticha programme after engagement pps