मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वेला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शिवानीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधली. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हा लग्सोहळा पार पडला. शिवानी-अजिंक्यच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक दिवसांपासून शिवानी व अजिंक्यच्या लग्नची चर्चा सुरु होती. अखेर दोघांनी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३१ जानेवारीला दोघांचा साखरपुडा पार पडला. आता लग्नानंतर अजिंक्य व शिवानी एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. दोघे एका सुंदर ठिकाणी हनिमूनला गेले आहेत.

हेही वाचा- “मंगळसूत्र घालायची लाज…” लग्न व घटस्फोटाच्या चर्चांवर जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली….

अंजिक्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवरुन तो आणि शिवानी निसर्गरम्य जागी फिरायला गेल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअऱ करत त्याने मला तिची पुन्हा ओळख करुन देण्याची परवानगी द्या. माझ्या पत्नीला भेटा” अशी कॅप्शनही दिले आहे. शिवानी व अजिंक्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

शिवानी व अंजिक्यच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शिवानी देवयानी मालिकेतून घराघरांत पोहचली. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला होता. मालिकांबरोबर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा झिम्मा २ चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपपटाने चांगली कमाईक केली होती. तर अंजिक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve ajinkya nanaware share honeymoon moments with wife shivani surve dpj