‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेनंतर आता ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी लवकरच सुरू होत आहे. या नव्या मालिकेतून ‘स्टार प्रवाह’चे जुने व लोकप्रिय चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘देवयानी’ फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे व ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. अशातच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

१७ जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सुरू होणारी ‘थोडं तुझं थोडं माझं’ नव्या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे मानसी सणस या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता समीर परांजपे तेजस प्रभूच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी, प्रणव प्रभाकर असे बरेच कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग होतंय ते आलिशान क्रूझ पाहिलंत का? प्रसिद्ध पंजाबी गायकाने व्हिडीओ केला शेअर, म्हणाला…

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये नवी जोडी पाहायला मिळत आहे. ज्या गायत्री प्रभू मानसीच्या आदर्श असतात त्याच गायत्री प्रभूच्या विरोधात तेजस असतो. कारण गायत्री ही तेजसची वहिनी असते. ही वहिनी त्यांचा वाडा विकण्यासाठी प्रयत्न करत असते पण तेजस सही न देऊन करार रद्द करत असतो. त्यामुळे आता गायत्रीला आदर्श मानणारी मानसी आणि गायत्रीच्या विरोधात असणारा तेजस एकत्र कसे येतात? यांचं नातं कसं तयार होतं? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. पण या नव्या प्रोमोमुळे शिवानी सुर्वे व समीर परांजपे यांची नवी जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेच्या नव्या प्रोमोचं कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेत्री सायली संजीव, पूजा बिरारी, ऋतुजा बागवे, साक्षी गांधी, अशा अनेक कलाकारांनी प्रोमोचं कौतुक केलं आहे. तसंच “याला म्हणतात प्रोमो”, “खूप छान”, “किती भारी”, “भारी प्रोमो”, “मस्त”, “कमाल”, “छान प्रोमो” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील लीलाचं ‘हीरामंडी’तील ‘चौदहवी शब’ गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

दरम्यान, अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेद्वारे तब्बल ९ वर्षांनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर झळकणार आहे. तर अभिनेता समीर परांजपे ८ वर्षांनी पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे जुने चेहरे नव्या रुपात प्रेक्षकांची मनं कितपत जिंकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader