टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांचे प्रेक्षकांच्या आयुष्यात वेगळे स्थान असते. एखाद्या मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. आता ‘शिवा’ या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये शिवा दहीहंडीच्या उत्सवाला तिच्या माहेरी आली असून दरवर्षीप्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी मनोऱ्यावर सगळ्यात वर चढताना दिसते.

zee marathi new serial savlyachi janu savali
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
sara kahi tichyasathi marathi serial off air soon
वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा
Punha Kartvya Aahe
Video: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील ‘हा’ व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, “लेखकाला बुद्धी…”
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

दहीहंडीचा सोहळा शिवाच्या जीवावर बेतणार?

प्रोमोच्या सुरुवातीला, एक व्यक्ती पाना गँगला विचारते, कुठेय तुमची शिवा? जिची नुसतीच हवा, असे म्हणून तो आणि त्याचे साथीदार विचित्र पद्धतीने हसताना दिसत आहेत. त्यानंतर शिवाच्या सासरी सगळे जण जेवणाच्या टेबलवर एकत्र बसले असून शिवाला विचारतात, तुला आज वस्तीत जायचे असेल ना? त्यावर सीताई कुणी कुठेही जायची गरज नाही, असे म्हणताना दिसते. पाना गँग म्हणताना दिसते की, अशी एकही दहीहंडी नाही, जी शिवाने फोडली नाही. तेवढ्यात शिवाची एंट्री होते. शिवा आली असे म्हणत पाना गँग दंगा करताना दिसते. त्यानंतरच्या दृश्यात शिवाची नणंद एका व्यक्तीला पैसे देत शिवाची दहीहंडी फोडायची हौस पूर्ण झाली पाहिजे, असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर शिवा दहीहंडी फोडायला मनोऱ्यावर चढते, पण त्यानंतर ती खाली पडताना दिसत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “दहीहंडीचा सोहळा शिवाच्या जीवावर बेतेल का…?” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: झहीर इक्बालशी दोन महिन्यांपूर्वी ज्या घरात लग्न केलं तेच विकतेय सोनाक्षी सिन्हा; कारण नेमकं काय? जाणून घ्या

मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवा आणि आशुचे लग्न सीताईला मान्य नाही, त्यामुळे तिने शिवाकडून घटस्फोटाचे पेपर सह्या करून घेतले आहेत. पण, शिवाने सीताईला मी सहा महिन्यात आशुबरोबरच घरातील सर्वांचे मन जिंकून दाखवेन असे म्हटले आहे. तिच्या या प्रयत्नात तिची नणंद सतत अडथळे निर्माण करत असल्याचे पाहायला मिळते. शिवा सिताई, आशु यांचे मन जिंकण्यासाठी विविध गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आता दहीहंडी फोडताना शिवाच्या जीवावर बेतणार का? प्रोमोत ज्याप्रकारे ती खाली पडत आहे, तिला कोण वाचवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.