झी युवा वाहिनीचा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. ‘झी युवा सन्मान २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुण, तरुणींना सन्मानित करण्यात आलं. युवा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही झी युवा पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

खासदार श्रीकांत शिंदे यांना झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत झी वाहिनीचे आभार मानले आहेत.

हेही वाचा>> महिन्याभरापूर्वीच आकांक्षा दुबेने दिलेली प्रेमाची कबुली; व्हॅलेंटाइन डेला समर सिंहबरोबर शेअर केलेला फोटो, म्हणाली…

झी युवा २०२३ पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करत श्रीकांत शिंदे म्हणतात…

इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये भारतात अग्रगण्य असलेल्या झी समूहातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘झी युवा सन्मान २०२३’ या सोहळ्यात ‘युवानेतृत्व सन्मान’ देऊन मला गौरविण्यात आले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने राज्यभरात केल्या जाणाऱ्या जनसेवेची आणि लोकप्रतिनिधी म्हणून करत असलेल्या विकासकामांची दखल घेतल्याबद्दल झी समूहाचे मनःपूर्वक आभार.

हेही वाचा>> बॉलिवूडमधील ‘या’ सुप्रसिद्ध गायिकेने गायलं झी मराठीच्या नवीन मालिकेचं शीर्षकगीत, व्हिडीओ व्हायरल

श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. २०१९च्या निवडणुकीत त्यांना कल्याण मतदारसंघासाठी शिवसेनेकडून तिकीट मिळालं होतं. या निवडणुकीत भरघोस मतांी विजयी होत ते खासदार झाले. पेशाने डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे लोकसभेत कल्याण मतदारसंघांचं नेतृत्व करत आहेत.

Story img Loader