टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर व अभिनेता शोएब इब्राहिम पालक झाले आहेत. २१ जून रोजी दीपिका व शोएबच्या घरी चिमकुल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिने एका मुलाला जन्म दिला, पण मुलाजा जन्म वेळेआधीच झाल्याने तो रुग्णालयात आहे. इतकं नव्हे तर चार दिवसांपासून दीपिकाही रुग्णालयातच आहे. शोएबने बाळाच्या व दीपिकाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश मांजरेकर हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना का घेतात? ‘वास्तव’मध्ये संजय नार्वेकरला घेण्याचा किस्सा शेअर करत म्हणाले…

‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शोएब इब्राहिम म्हणाला, “तुम्हाला माहित आहे की दीपिका आणि मी आई-बाबा झालो आहोत. आम्हाला मुलगा झाला आहे. पण सध्या मी यापेक्षा जास्त बोलू शकणार नाही. बाळ प्रिमॅच्युअर आहे आणि ते इनक्यूबेटरमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी बाळासाठी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.”

दरम्यान, शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पत्नी दीपिकाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दीपिका रुग्णालयात असल्याचं दिसत आहे. दीपिका आता ठिक आहे, असं कॅप्शन शोएबने या फोटोला दिलंय.

शोएबची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, २१ जून रोजी दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत बाळाच्या जन्माबाबत माहिती दिली होती. तसेच मुलगा प्रिमॅच्युअर असल्याने तो रुग्णालयात असल्याचंही तिने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib ibrahim shared dipika kakar photo from hospital premature baby health update hrc