‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाने ७ वर्षांपूर्वी अभिनेता शोएब इब्राहिमशी आतंरधर्मीय लग्न केलं आणि या जोडप्याला एक मुलगा आहे. पण शोएबशी लग्न करण्याआधी दीपिकाचा घटस्फोट झाला होता. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी होती, त्या मुलीला दीपिकाने सोडून दिलं असा आरोप तिच्यावर होतो. या आरोपांवर दीपिकाने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिका कक्करने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नाबद्दल भाष्य केलं. घटस्फोट, त्यामुळे झालेल ट्रोलिंग आणि त्याचा आयुष्यावर झालेला परिणाम याबद्दल ती व्यक्त झाली. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी आहे असं म्हटलं जातं, त्याबद्दलही दीपिकाने प्रतिक्रिया दिली आहे. “मी एका आईवर इतके मोठे आरोप करण्याचा कधीच विचार करू शकत नाही की तिने आपल्या मुलीला सोडून दिलं,” असं दीपिका म्हणाली.

दीपिका म्हणाली की, या आरोपांचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. तिचा एकदा गर्भपात झाला होता आणि दुसऱ्यांदा जेव्हा ती गरोदर होती तेव्हा तिच्या मनात बरेच विचार येत होते. तिला चिंता वाटत होती की या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नसले तरी तिच्या बाळाचा जन्म झाल्यावर लोक असंच म्हणतील. रुहान एक प्रीमॅच्युअर बाळ आहे आणि त्याचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता, असंही दीपिकाने नमूद केलं.

दीपिकाने सासूचं केलं कौतुक

दीपिकाने तिच्या सासूचे कौतुक केले. “अम्मीने (सासू) कठीण काळात माझी काळजी घेतली. मी शोएबवर सर्वात जास्त प्रेम करते. कारण जेव्हा मी या सगळ्या कठीण परिस्थितीतून जात होते, कोर्टात जायचे तेव्हा शोएबनेच काळजी घेतली होती,” असं दीपिका कक्कर म्हणाली.

दीपिका कक्करचं पहिलं लग्न

दीपिका कक्करचं पहिलं लग्न २०११ मध्ये रौनक सॅमसन नावाच्या पायलटशी झालं होतं. पण लग्नानंतर त्यांच्यातील मतभेद वाढले आणि २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दीपिका ‘ससुराल सिमर का’मधील सह-कलाकार शोएब इब्राहिमच्या प्रेमात पडली. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केलं आणि २०२३ मध्ये ते एका मुलाचे आई-बाबा झाले. त्यांच्या मुलाचं नाव रुहान आहे.