‘ससुराल सिमर’ का फेम अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या चर्चेत आहे. दीपिका गरोदर असून लवकरच आई होणार आहे. दीपिका व शोएब त्यांच्या बाळासाठी आतुर आहेत. गरोदरपणातील काळ दीपिका एन्जॉय करताना दिसत आहे. शोएब दीपिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. दीपिकाबाबत कमेंट करणाऱ्या एका नेटकऱ्याला शोएबने उत्तर दिलं आहे.
दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने नुकतंच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये शोएबला दीपिकाबाबत एका युजरने प्रश्न विचारला. “दीपिका गरोदरपणात एवढं जंकफूड का खाते? तिला होणाऱ्या बाळाची काळजी नाही का?,” असं एका युजरने विचारलं होतं. युजरच्या या प्रश्नावर शोएबने उत्तर दिलं आहे.
हेही वाचा>> “तुमची आवडती अभिनेत्री कोण?” रोहित पवार उत्तर देत म्हणाले, “मला…”
“प्रत्येक आईला तिच्या बाळाची काळजी असते. तिच्यासाठी पौष्टिक आहारही असतो. पण शेवटी गरोदरपणात तिला इच्छा होते, ते ती खाते. दीपिका तिचं गरोदरपण खूप एन्जॉय करत आहे आणि ती आनंदी आहे,” असं उत्तर शोएबने दिलं आहे.
शोएबबरोबर दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे. २०१३ साली तिने पायलट रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. परंतु, अवघ्या दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१८मध्ये दीपिकाने शोएबशी लग्नगाठ बांधली. आता ते दोघेही आईबाबा होणार आहेत.