‘कुंडली भाग्य’ या हिंदी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. श्रद्धा आर्या व अंजुम फकीह या अभिनेत्रींची या मालिकेमधील भूमिका तर विशेष गाजली. काही दिवसांपूर्वीच अंजुमने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे श्रद्धाबरोबर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये श्रद्धाने अंजुमच्या स्तनांवर हात ठेवलेला दिसत होता. आता श्रद्धाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

श्रद्धाच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्यावर्षी पती राहुल नागलबरोबर श्रद्धाने थाटामाटात लग्न केलं. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्रद्धाने नवऱ्यासह एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

या व्हिडीमध्ये श्रद्वा व राहुल रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. तसेच डान्स करत असताना श्रद्धा राहुलला किस करत आहे. व्हिडीओमध्ये दोघांची सावली दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – लेकीबरोबर लिप किस करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले…

९० हजारपेक्षा अधिक लोकांनी श्रद्धाचा हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. १६ नोव्हेंबर २०२१मध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थित श्रद्धा-राहुलने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.