‘आशिकी २’ चित्रपटापासून शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा घराघरांत लोकप्रिय झाली. बॉलीवूडमध्ये काही वर्षांतच अभिनेत्रीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘तू झुठी मैं मक्कार’, ‘ओके जानू’, ‘स्त्री’, ‘बागी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या फोटोवर तिचे असंख्य चाहते कमेंट्स करत असतात. या सगळ्यांना अभिनेत्री काहीशा मजेशीर अंदाजात उत्तर देत असते.

श्रद्धाने पांढऱ्या रंगाचं टीशर्ट आणि ब्लॅक जॅकेट परिधान करून वेस्टर्न लूकमधले स्टायलिश फोटो नुकतेच इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या फोटोला श्रद्धाने “आज क्या नही करना है?” असं कॅप्शन दिलं होतं. यावर केवळ तिच्या चाहत्यांनीच नव्हे तर अनेक कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shraddha Kapoor
Video: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकले मन; अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “तिच्या संस्कारातून…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
kareena kapoor khan flop movie to hit jab we met
एकामागोमाग एक १० सिनेमे झाले फ्लॉप, नैराश्यात गेली अभिनेत्री; एक्स बॉयफ्रेंडने वाचवलं करिअर
Kishori Shahane, Ashok Saraf and Nivedita Saraf great meet photo viral
किशोरी शहाणे, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची ग्रेट भेट; अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाल्या, “मी स्वतःला…”
Marathi actress Rupali Bhosale and Kushal Badrike had a meeting accidentally
रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”
Zeenat Aman And Raj Kapoor
राज कपूर यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमात घ्यावं यासाठी झीनत अमान यांनी लढवली होती युक्ती; म्हणाल्या, “मी डिंकाने माझ्या चेहऱ्यावर…”
Stree 2 fame Shraddha Kapoor might also join telugu allu arjun much awaited pushpa 2 movie
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा
Annu Kapoor recalls on kiss controversy
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?

हेही वाचा : सायली-अर्जुनमध्ये आता नवीन कॉन्ट्रॅक्ट! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो

‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलने श्रद्धाच्या पोस्टवर खास कमेंट करत लक्ष वेधलं आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर श्रद्धाने देखील उत्तर दिलं आहे. “बहुत सारा खाना है” अनघाच्या या कमेंटवर उत्तर देत श्रद्धाने “रविवार + बहुत सारा खाना = बेस्ट कॉम्बो” असं म्हटलं आहे.

हेही वाचा : “अरे हे कंचन…”, ४३ वर्षांपूर्वीच्या जुन्या गाण्यावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

अनघाने कमेंट्समधील या संभाषणाचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत “always hungry” असं लिहिलं आहे. बॉलीवूडमधल्या स्टार अभिनेत्रीने कमेंटला रिप्लाय दिल्याने अनघाने आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा : लाडक्या आईसाठी परदेशातून आली मुलं; माधुरी दीक्षितने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! डॉ. नेनेंनी शेअर केला Inside व्हिडीओ

anaghaa
अनघा अतुलने शेअर केला स्क्रीनशॉट

दरम्यान, श्रद्धा कपूर तिला व्यग्र शेड्यूलमधून वेळ मिळाला की, तिच्या फोटोवर येणाऱ्या असंख्य कमेंट्सला उत्तर देत चाहत्यांचं नेहमीच मन जिंकून घेत असते. आता लवकरच श्रद्धा बहुचर्चित ‘स्त्री’ चित्रपटाच्या पुढच्या भागात झळकणार आहे. याशिवाय अनघा अतुलच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत तिने श्वेता हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. या मालिकेमुळे भगरे गुरुजींच्या लेकीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. तर, यानंतर अनघाने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या ‘कलर्स मराठी’वरील मालिकेत सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारली होती.