Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘स्त्री २’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने अभिनेत्री सध्या विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत आहे. नुकतीच श्रद्धाने ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन ४’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी श्रद्धाच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकून घेतलं.

बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरला ( Shraddha Kapoor ) ओळखलं जातं. ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची ती लेक आहे आणि अभिनेत्रीची आई मराठी आहे. त्यामुळे श्रद्धाला छान असं मराठी बोलता येतं. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांच्या ती संपर्कात असते. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये श्रद्धाच्या सुंदर मराठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय एका स्पर्धकाला अभिनेत्रीने खास गिफ्ट देखील दिलं.

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर येणार नवीन मालिका! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता प्रमुख भूमिकेत, तर अभिनेत्री…; पाहा जबरदस्त प्रोमो

मराठीत संवाद साधत श्रद्धाने स्पर्धकाला दिलं गिफ्ट

श्रद्धा कपूरने अर्जुन साठे या स्पर्धकाला खास भेटवस्तू दिली. अभिनेत्री या स्पर्धकाला म्हणते, “मी काहीतरी आणलंय… मी तुला द्यायला येऊ का?” मंचावर जाताच श्रद्धा पुढे सांगते, “गणपती बाप्पा माझे फेव्हरेट आहेत त्यामुळे ही त्यांची मूर्ती माझ्याकडून तुला भेट… या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा” अभिनेत्रीने अर्जुन या स्पर्धकाला भेट म्हणून बाप्पाची मूर्ती दिली.

श्रद्धा कपूरचा ( Shraddha Kapoor ) हा व्हिडीओ ‘सोनी टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. श्रद्धाच्या साधेपणाचं आणि अभिनेत्रीने दिलेल्या भेटवस्तूचं युजर्सनी कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : एलिमिनेशनपासून सुटका! सगळे झाले ‘सेफ’ पण, रितेश देशमुखने सांगितला मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?

shraddha kapoor
श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor ) व अर्जुन साठे ( फोटो सौजन्य : Arjun Sathe इन्स्टाग्राम )

दरम्यान, श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, याचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता दुसऱ्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्यासह पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘स्त्री 2’ चं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader