हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर आता अभिनेता अक्षय म्हात्रे लवकरच झी मराठीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेची मूळ कथा झी टीव्हीवरील हिंदी मालिका ‘पुनर्विवाह – जिंदगी मिलेगी दोबारा’ या हिंदी मालिकेवर आधारित आहे.
पुन्हा लग्न करण्याच्या संकल्पनेवर आधारित ही मालिका आहे. यात अक्षय म्हात्रे व अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीतील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. ही मालिका नेमकी किती वाजता प्रदर्शित होणार आणि कोणती जुनी मालिका गाशा गुंडाळणार याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
‘पुन्हा कर्तव्य आहे’ अक्षया हिंदळकर, अक्षय म्हात्रे, वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर व रेयांश जुवाटकर हे कलाकार दिसतील. ही मालिका नेमकी कधीपासून प्रसारित होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अक्षय म्हात्रेबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २१ डिसेंबर २०२३ रोजी त्याची गर्लफ्रेंड व अभिनेत्री श्रेनू पारीखशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याने शाही सोहळा आयोजित करून लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.