झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहा या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचप्रमाणे या मालिकेत ‘परी’ची भूमिका करणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळही सर्वांच्या चांगलीच लाडकी झाली. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग येणार का, याबद्दल बऱ्याच चर्चा रंगल्या. आता श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीने यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच ‘पोस्टर बॉईज २’ या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला. श्रेयस आणि त्याची पत्नी यावर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या पोस्टर लॉन्च सोहळ्यादरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दीप्तीने ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा भाग तिला पाहायला नक्कीच आवडेल असं सांगितलं.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

दीप्ती म्हणाली, “‘माझी तुझी रेशीमगाठ २’ पाहायला मला नक्कीच आवडेल. याबाबत मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांना विचारलं पाहिजे की ते ही मालिका घेऊन येणार आहेत का. प्रार्थना आणि श्रेयस या दोघांची जोडी या मालिकेत खूप छान दिसली आहे. फक्त ती दोघेच नाही तर या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. या सगळ्या कलाकारांची भट्टी खूप छान जमली होती. त्यामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’ सुरू झाली तर मला नक्कीच ती पहायला आवडेल.”

हेही वाचा : ‘ओम शांती ओम’च्या वेळी शाहरुख खानने श्रेयस तळपदेला दिला मोठा धडा, खुलासा करत अभिनेता म्हणाला, “त्याने मला…”

दीप्तीचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. त्यामुळे आता भविष्यात खरोखरच ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा भाग येणार का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas talpades wife dipti shared her views about majhi tujhi reshimgath rnv