मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. मराठीबरोबर तिने तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘झी मराठी’वरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रुती घराघरांत लोकप्रिय झाली. नुकतीच तिने ‘आरपार’ युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले. तसेच मराठी इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत देखील श्रुतीने या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रुती मराठे सांगते, “अनेक वर्षांपूर्वी मराठी इंडस्ट्रीत मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तेव्हा या क्षेत्रात काम करून मला बरीच वर्षे झाली होती. मी अगदीच नवखी नव्हते. आपल्या इंडस्ट्रीत बऱ्याच जणांचा अभिनेत्री कायम उपलब्ध असतात असा गैरसमज आहे. अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं. हे कोणी पसरवलं? या गोष्टी कुठून सुरु झाल्या? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमुक गोष्टी कराव्याच लागतात हे कुठून आलंय? मला खरंच समजत नाही.”

हेही वाचा : ‘ओले आले’ व ‘झिम्मा २’च्या यशानंतर सायली संजीवने घेतला महत्त्वाचा निर्णय; म्हणाली, “सोशल मीडियापासून…”

श्रुती पुढे म्हणाली, “एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी मला या चित्रपटासाठी तुझं मानधन काय आहे? असं विचारलं. मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली. तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास, तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते नक्की देईन. आम्ही दोघंच तेव्हा चर्चा करत होतो आणि ती व्यक्ती मला तोंडावर असं बोलली होती…दोन ते तीन मिनिटांसाठी मी ब्लँक झाले होते.”

हेही वाचा : आमिर खानच्या पहिल्या पत्नीने शेअर केला त्याचा व आयरा खानचा सुंदर फोटो; रीना दत्ता म्हणाली, “मी नेहमीच…”

“पुढे, काय बोलावं मला सुचत नव्हतं. मला घाम फुटला कारण, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. ती परिस्थिती नेमकी कशी हाताळायची याची काहीच कल्पना नव्हती. थोडा विचार करून मला जाणवलं या माणसाला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. माझं असं झालं या माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि मी त्याला थेट म्हटलं, “अच्छा…म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का?” तेव्हा तो माणूस समोरुन विचारतो ‘हे काय बोलतेस तू?’ नंतर मी त्यांना म्हणाले, माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? यापुढे कोणाशीही बोलताना थोडा तरी अभ्यास करून या.” असा धक्कादायक अनुभव श्रुतीने या मुलाखतीत सांगितला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti marathe open up about casting couch experience in marathi industry reveals shocking incident sva 00