Shubh Vivah Fame Marathi Actress : ‘शुभविवाह’ ही मालिका गेल्या २ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मालिकेत पौर्णिमा या खलनायिकेची भूमिका अभिनेत्री कुंजिका काळवींट साकारली आहे. कुंजिका या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. मात्र, नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर करत कुंजिकाने आपल्या कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याचं सांगितलं आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुंजिकाचे पती निखिल काळवींट यांच्या मामांच निधन झालं आहे. ते अभिनेत्रीला मुलगी मानायचे. कुंजिकाने त्यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : Video: ‘या’ व्यक्तीमुळे अहिल्यादेवी-आदित्यमध्ये येणार दुरावा; आई-मुलाच्या नात्यात होणार गैरसमज, पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो

अभिनेत्री कुंजिकाची भावुक पोस्ट

मामा…
हा शब्दच केवढा गोड आहे ना… आणि आमचे मामा त्याहूनही गोड!

मनोज मामा…

खरं तर तुम्ही निखिलचे मामा पण, हे तुम्ही मला कधीच जाणवू दिलं नाही. जणू माझेच “हक्काचे मामा”.

माझं लग्न लवकर झाल्यामुळे मनात बऱ्याच वेळा धागदुग असायची, लग्न झालं की नाती बदलतात. पण, कुटुंबात काही जण असे असतात जे सासर माहेर या पलीकडे जाऊन प्रेम करतात. तुम्ही अगदी तसंच केलंत. मनोज मामा तुम्ही मला किती पटकन आपलंसं केलंत!

अतिशय निर्मळ, प्रेमळ, नेहमी प्रसन्न राहणारे असे.

तुमच्यासाठी जशी गार्गी तशीच मी.
माझ्या प्रत्येक शोचा प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे, सगळे interview बघणारे..

माझा सगळ्यात loyal audience !!

सासरे नाहीच, मनोज मामा म्हणजे कधी वडील, कधी वयाने मोठा असलेले मित्र तर कधी सल्लागार.
घरात काही ही झालं की, आधी फोन जाणार तो मनोज मामाला.

आमच्या नेहमीच छान गप्पा व्हायच्या. कामात अजून प्रगती कशी करता येईल हे अगदी जरुर नमूद करायचे. वेगळीच गट्टी होती मामा तुमच्याशी आणि ती मी कायम खूप miss करणारे.

तुम्ही खूप धीराने इतक्या मोठ्या आजाराला टक्कर दिलीत जराही कुरकुर न करता, जमेल तितक्या स्वावलंबीपणे जमेल तसं सगळं केलंत आणि अर्थात या सगळ्यात मामीची साथ खरंच खूप मोलाची ठरली. त्यांनी जे आणि जितकं केलं ते इतर कोणी करूच शकलं नसतं. जोडीदार म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण!

अचानक बाप्पाला तुमची आठवण आली आणि अगदीच एका दिवसात तुम्हाला आमच्यातून घेऊन गेला. अजून थोड थांबायला हवं होत मामा. तुमची उणीव नेहमीच जाणवत राहील. माझ्या मनात आयुष्य भर ‘मामा’ ही जागा रिकामी राहील.

तुमचे भाचे (निखिल सौरभ) अगदी तुमच्या सारखेच आहेत आणि याचा मला खूप अभिमान आहे.
गार्गीवरचं माझं प्रेमही तुम्हाला माहितीये.
त्यामुळे आता इथली काळजी करू नका.

तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
जिथे असाल तिथून फक्त लक्ष ठेवा.
तुम्ही आयुष्यभर आमच्या स्मरणात राहाल
खूप प्रेम
कुंजिका

दरम्यान, अभिनेत्री कुंजिका काळवींटच्या ( Actress Kunjika Kalwint ) पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubh vivah fame actress kunjika kalwint father in law death shares emotional post sva 00