‘भाबीजी घर पर हैं’ ही टीव्ही मालिका खूप लोकप्रिय आहे. यातील प्रत्येक पात्र लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. यातील एक पात्र अंगूरी भाभी देखील लोकांच्या खूप आवडीचे आहे. अंगूरी भाभी भूमिका साकारून अभिनेत्री शुभांगी अत्रे खूप प्रसिद्ध झाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं आहे. पडद्यावर सगळ्यांना हसवणारी शुभांगी तिच्या वैयक्तिक आयुष्यात एकटी आहे. ती ४२ वर्षांची असून एका मुलीची आई आहे. तिने नुकतंच तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

शुभांगी अत्रे हिचे लग्न कमी वयातच झाले होते. अवघी २० वर्षांची असताना तिचं पियुष पुरेशी लग्न झालं आणि १९ वर्षे संसार केल्यानंतर या जोडप्याने घटस्फोट घेतला. तिने घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता. अशातच शुभांगीने तिच्या मोडलेल्या संसाराबद्दल ‘ई-टाइम्स’ला माहिती दिली. हा काळ तिच्यासाठी भावनिकरित्या खूप चढ-उतारांनी भरलेला होता. कारण १९ वर्षांच्या संसारातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. पण आता सगळं घडून गेलंय त्यामुळे फार काही वाटत नाही, असं शुभांगी म्हणाली.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
minor girl posted her video with boyfriend on Instagram
नागपूर : अल्पवयीन प्रेयसीने ‘इंस्टाग्राम’वर व्हिडिओ टाकला अन् प्रियकर अडकला…
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म

फक्त पाच चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने शाहरुख खानसह दिग्गजांना टाकलं मागे, ‘या’ बाबतीत पटकावला पहिला क्रमांक

शुभांगी अत्रे दुसरं लग्न करणार का?

शुभांगी अत्रे पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की मी आयुष्यात पुन्हा कोणावर प्रेम करू शकेन. आता मी हे करू शकणार नाही. आता माझं कामच माझा जोडीदार आहे. रिलेशनशिपसाठी मी आयुष्यातील सर्व मार्ग बंद केले आहेत.” शुभांगी कमी वयातच एका मुलीची आई झाली होती. आता तिची मुलगी १८ वर्षांची असून ती अमेरिकेत शिकत आहे. शुभांगी म्हणते की तिची मुलगी तिची सर्वात मोठी समीक्षक आणि जवळची मैत्रीण आहे.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

शुभांगीने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या शोमधून टीव्हीवर तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये तिने पलचीन बसूची भूमिका साकारली होती. यानंतर अभिनेत्रीने ‘कस्तुरी’ आणि ‘दो हंसों का जोडी’ सारख्या शोमध्ये काम केलं आणि त्यानंतर ती ‘भाबीजी घर पर हैं’मध्ये दिसली. या मालिकेत अंगूरी भाभी बनून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

Story img Loader