अभिनेत्री शुभांगी गोखले या गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या बोलण्याच्या शैलीसाठी देखील ओळखल्या जातात. तर आता त्यांनी त्यांची मिमिक्री करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुभांगी गोखले यांच्या बोलण्याची एक वेगळीच शैली आहे. तर त्याची अनेक अभिनेत्री मिमिक्रीही करत असतात. श्रेया बुगडेने केलेली शुभांगी गोखले यांची मिमिक्री प्रेक्षकांना आवडते, तर याबरोबरच नुकतीच तेजश्री प्रधान हिनेही त्यांच्यासमोर त्यांच्या बोलण्याची मिमिक्री करून दाखवली. त्यावर शुभांगी गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : सुश्मिता सेनची प्रमुख भूमिका, तर जावई सुव्रत तृतीयपंथीयाच्या भूमिकेत…; ‘ताली’ पाहून शुभांगी गोखले म्हणाल्या…

शुभांगी गोखले सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेच्या टीमने नुकतीच ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तेजश्री प्रधानने शुभांगी गोखले यांची मिमिक्री केली. त्यावर उत्तमोत्तम मराठी अभिनेत्रींनी आपली मिमिक्री करण्याबद्दल शुभांगी गोखले यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला खूप छान वाटतं, कारण तुमची नक्कल सगळे तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही लोकांना खूप आवडता.”

हेही वाचा : शुभांगी गोखले यांचा जुना फोटो शेअर करत सखी गोखलेची आईसाठी खास पोस्ट

तर आता त्यांनी दिलेलं हे उत्तर चर्चेत आलं असून तेथील त्यांच्यासह कलाकारांनीही टाळ्या वाजवत त्यांचं हे उत्तर त्यांना आवडल्याचं दर्शवलं.