छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता बनेला ओळखले जाते. सध्या ती कन्यादान या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत ती वृंदा हे पात्र साकारत आहे. या मालिकेत राणा म्हणजेच अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचा साखरपुडा पार पडला. आता शुभंकरने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे.

‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा-राणा म्हणजेच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. यावेळी अमृताने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. तर शुभंकरने त्याच रंगाचा कुर्ता घातला होता. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता शुभंकरने त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
आणखी वाचा : “काय कमाल आहे ना बायकांची?”, ‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट; म्हणाला, “तुम्ही खरंच…”

Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
nana patekar goat balm kissa
एसीमुळे बोकड शिंकलं, त्याच्या छातीला बाम लावला अन्…; नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “पुण्यात येऊन…”
BJP leader Navneet Rana expressed her displeasure in a post by poetic lines to MLA Ravi Rana for not getting a ministerial berth
“जिंदगी है… लडाई जारी है…”, काव्‍यात्‍मक पोस्‍टमधून नवनीत राणांनी व्‍यक्‍त केली नाराजी
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”

शुभंकर एकबोटेची पोस्ट

Look test for ‘कन्यादान’.. एक सुंदर मुंबई girl माझ्या पत्नीच्या भूमिकेत काम करणार आहे म्हणून character photos आणि look च्या दृष्टीने ‘तिला नवरा म्हणून मिठीत घे आणि hold करा’ असे दिग्दर्शकाने सांगितले.. त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं …. जरी ती professional गोष्ट असली तरीही कुठेतरी दोघांच्याही नजरेतून एक चमक पटकन येऊन गेली.. हि चमक अवघडलेपणाची होती का येणाऱ्या काळाचा इशारा देणारी होती हे मात्र त्या क्षणी लक्षात नाही आलं …तरीही photo .. Pose .. Look हे सोपस्कार झाले !..

This was our reel hug which was somewhat awkward for me!… आणि अशा तर्हेने आम्हा दोघांची somewhat awkward , happy , fresh & happening reel journey सुरु झाली ! मग ह्या journey मध्ये कामामुळे रोजच्या रोज भेटी , संवाद, वेगवेगळ्या emotion चे scenes आणि त्याबद्दल होणारा संवाद हे सगळं सुरु झालं !.. हि journey एक एक station घेत सुमारे 1 वर्ष 9 महिने अशीच चालू होती! अचानक एका station वर.. थोडी जरी संधी मिळाली तरी, एका दिवसाची सुट्टी मिळाली तरी माझ्या मूळ गावाकडे म्हणजेच माझ्या पुण्याकडे पळणारा मी .. अरे धावपळ का करतोस असा माझ्या बाबा चा ओरडा खाणारा मी 2-3 दिवस सलग सुट्टी मिळूनही मुंबईतच थांबायला लागलो!… हे का झाले ..?

तर ‘कुछ बाते बस हो जाती है , और शायद इसे ही प्यार कहते हैं!’ हे माझ्या लक्षात आले!… ‘घाईघाईत पुण्याला येऊ नकोस’असं म्हणणारा माझा बाबा ‘अरे 2 दिवस सुट्टी मिळून सुद्धा का नाही येतेस तू ..?’ असं म्हणायला लागला … कधीच कल्पनेच्या canvas वर नसलेलं चित्र माझं मन कधी नकळतपणे रंगवायला लागलं त्यात रंग भरू लागलं हे माझं मलाच समजलं नाही !…. ओळख तर reel journey मध्ये झालीच होती पण आता हळू हळू खऱ्या मैत्री ला सुरुवात झाली!… त्यात कामा व्यतिरिक्त भेटी,कोणत्याही विषयावर अवांतर चर्चा , रात्री उशिरापर्यंत घरा जवळ कट्टा टाकणे , मुंबईतल्या वेगवेगळ्या special जागांवर फिरणं , खूप variety ची खवय्येगिरी , नाटक , सिनेमा, कविता , गाणी, SRK वर असलेलं unconditional प्रेम , मराठा मंदिर मध्ये जाऊन ddlj चा show एकत्र बघणं , third wave coffee , cadbury crackle , little hearts, marine drive , पुण्याची सफर , colaba causeway , crawford market आणि बरंच काही … हळू हळू मुंबईची local train जशी track हळुवारपणे change करते तसंच reel journey ने सुंदर real journey चा track पकडला!… राज अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलटके देखेगी… और लड़की ने पलटकर देखा!, असे शुभंकर एकबोटेने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वत:च घर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला “कर्ज, जमवाजमव अन्…”

दरम्यान अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्यानंतर आता त्या दोघांनीही साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Story img Loader