‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘शुभविवाह’. २०२३पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचा चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आकाश-भूमीचं प्रेम आणि रागिणीचं नवनवीन कारस्थान पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. सध्या रागिणी चांगुलपणाचा आव आणून कट-कारस्थानं करताना दिसत आहे. आकाश-भूमीला उद्ध्वस्त करण्यासाठी तिने मर्यादेची सीमा ओलांडली आहे. भूमीच्या बाळाची तिने आदलाबदल केली. भूमीचं बाळ एका मंदिरात ठेवून त्या जागी मृत बाळ ठेवते. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की, भूमीच्या बाळाचं निधन झालं. पण रागिणीशी हात मिळवणी करून ज्या नर्सन बाळाची आदलाबदल करण्यात मदत केलेली असते. तिचं नर्स पुढे जाऊन रागिणीचा पदार्फाश करते.

मंदिरात ठेवलेलं बाळ पारितोष आणि अमुलीला भेटतं. तेच बाळ आपलं असल्याचं सतत भूमीला जाणवतं असतं. एवढंच नाहीतर त्या बाळाच्या पायावर असलेली जन्मखून आकाशच्या आईच्या पायावर असते. त्यामुळे अमुलीकडे असलेलं बाळ आपलंच असल्याचा भूमीचा विश्वास आणखी दृढ होतं जातो. पण, तिच्याकडे सबळ पुरावे नसतात. तसंच अमुली व पारितोष भूमीला सतत बाळाला भेटू देत नाही.

एकेदिवशी भूमी झोपलेली असते तेव्हा तिला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. तिचा जीव कासावीस होतो. तेव्हा भूमी धावत पळत पारितोषच्या घरी जाते. पण, पारितोषच्या घराचा दरवाजा बंद असतो. तो बायकोबरोबर कानात कॉर्ड लावून रोमँटिक झालेले असतात. दोघं डान्स करत असतात. दुसऱ्या बाजूला बाळ खूपच रडत असतं. त्यामुळे भूमी शिडी लावून वर चढून खिडकीतून पारितोषच्या घरात जाते. त्यानंतर बाळाला उचलून शांत करत असते. तितक्यात पारितोष व अमुलीला भूमीला बघतात. याच सीनमागची भूमीची मेहनत याचा व्हिडीओ समोर आला आहे.

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर भूमीचा चित्तथरारक सीन मागची गोष्ट शेअर करण्यात आली. ज्यामध्ये भूमीची इमारतीवर चढण्यासाठी पडद्यामागची मेहनत पाहायला मिळत आहे. भूमीच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्नेस लावून भूमीने हा सीन केलेला दिसत आहे.

भूमीचा हा व्हिडीओ पाहून काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मस्तच भूमी…आपल्या बाळासाठी हिरकणी बनली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, प्लीज भूमीचं बाल तिला परत द्या. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कमाल भूमी….आणि हो अर्थातच भूमी आता एक आई आहे आणि एक आई आपल्या बाळासाठी जगाच्या कोणत्याही टोकाला पोहोचू शकते.”

Story img Loader