‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’, ‘वादळवाट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री श्वेता शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री म्हणून यश आजमावल्यावर तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. श्वेताने मराठी कलाविश्वात ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ अशा अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी नवरात्र उत्सवानिमित्त पार पडलेल्या ‘उत्सव आदिशक्ती’चा या प्लॅनेट मराठीच्या कार्यक्रमाला श्वेता शिंदेने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिला आयुष्यात आलेल्या थरारक अनुभवाविषयी सांगितलं.
श्वेता शिंदे म्हणाली, “मी गाडीतून जात असताना रस्त्यात मला एक गरोदर बाई चालताना दिसली. तिच्याबरोबर तिची सासू किंवा आई असावी. त्या बाईकडे पाहताक्षणी मला कळलं की, तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या आहेत म्हणून मी लगेच थांबले कारण, तेव्हा मी स्वत: गरोदर होते. त्या दोघीही रस्त्यावर फेऱ्या मारत पुन्हा त्याच जागी येऊन बसल्या. मी आजूबाजूच्या लोकांकडे नेमकी ती बाई कुठे जातेय याबद्दल चौकशी केली.”
श्वेता पुढे म्हणाली, “चौकशी केल्यावर मला समजलं की, एका सरकारी रुग्णालयात त्या गरोदर बाईला दाखल करून घेत नव्हते. तेव्हा मी सगळ्या लोकांना बडबडले आणि तिकडच्या सगळ्या बायकांना गोळा केलं. त्या बाईभोवती सगळ्या बायकांना वेढा घालायला सांगितलं. तेवढ्यात ती बाळंतीण झाली.”
“त्या भागात कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना त्या बाईला बाळ झालेलं होतं. अशा परिस्थितीत मी ते बाळ हातात घेतलं आणि त्या बाळाची नाळ दगडाने ठेचली. त्या बाळाला मी माझ्या ओढणीमध्ये गुंडाळून घेतलं. मला काहीच कळत नव्हतं…कारण, यापूर्वी मी असं केव्हाच अनुभवलं नव्हतं. त्यानंतर त्या संबंधित रुग्णालयात जाऊन मी सगळ्या डॉक्टरांना बडबडले… त्यांना तातडीने स्ट्रेचर आणायला सांगून त्या महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तेथील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं मॅडम ती बाई वाचणार नव्हती तुम्ही हे कसं केलं? माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. माझ्या घरच्यांना याबद्दल समजल्यावर त्यांना देखील माझं कौतुक वाटलं असे प्रसंग कधीच विसरता येत नाहीत.” असं अभिनेत्री श्वेता शिंदेने सांगितलं.