‘ई टीव्ही’ मराठी वाहिनीवर २००१ मध्ये ‘झोका’ ही मालिका प्रसारित केली जायची. छोट्या पडद्यावरील या अजरामर मालिकेला आता तब्बल २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने यामधील प्रमुख कलाकार व निर्माते ‘द केक्राफ्ट’ या युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत सहभागी झाले होते. यावेळी प्रसाद भारदे यांनी या कलाकारांशी संवाद साधला, तर अमोल पोंक्षे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे.

अभिनेत्री व आता निर्माती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वेता शिंदेने ‘झोका’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती या मालिकेविषयी सांगताना ती म्हणाली, “त्यावेळी मी हिंदी शोमध्ये काम करायचे पण, प्रतिमा ताईंची (लेखिका-दिग्दर्शिका) ‘प्रपंच’ ही मालिका मला खूप आवडायची. ‘प्रपंच’ या मालिकेचा मी एकही एपिसोड चुकवला नव्हता. त्यावेळी सोनाली पंडित यांच्या ओळखीने मी ‘प्रपंच’च्या सेटवर ताईंची भेट घेतली होती. पुढे, जेव्हा प्रतिमा ताईंचा ‘झोका’साठी फोन आला तेव्हा मी आनंदाने उड्या मारल्या होत्या अरे बापरे! त्यांना मला कास्ट करायचंय यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली होती.”

Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलच्या गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “अविनाश साहेब…”

श्वेता शिंदे पुढे म्हणाली, “प्रतिमा ताई, सुनिल बर्वे यांच्याशी बोलणं झाल्यावर मी निर्माते विद्याधर पाठारेंना भेटले. त्यांनी दैनंदिन मानधनाची एक विशिष्ट रक्कम मला सांगितली. मानधनाचा तो आकडा ऐकून माझ्या मनात असा विचार आला की, अरे एवढी रक्कम तर मी माझ्या बॉयला (मदतनीस) देते. ही रक्कम आपल्यासाठी कशी काय असू शकते? मला एका सेकंदासाठी ते माझ्या बॉयला मिळणारे पैसे सांगत असतील असंच वाटलं. कारण, तेव्हा मी फार लहान होते. पण, थोड्यावेळात निर्मात्यांनी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हणाले, नाही…नाही हे तुला मिळणारे पैसे आहेत बॉयला नाही. त्यांचं म्हणणं ऐकल्यावर मी असा विचार केला की, आपल्याला काहीच मिळत नाही असं समजायचं आणि सेटवर फक्त आनंदासाठी यायचं. इथे जो काही मोबदला मिळेल तो आपल्या बॉयला द्यायचा.”

हेही वाचा : “माझ्या सगळ्या स्किटमध्ये…”, गौरव मोरेने सांगितलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून ब्रेक घेण्याचं कारण

“पुढे सुवर्णा ताईंचा फोन आल्यावर मी हिंदी मालिकेच्या शूटिंगच्या तारखा जुळवून ‘झोका’ मालिकेसाठी वेळ काढला. या निमित्ताने माझं मराठीत ओपनिंग झालं आणि खूप चांगली संधी मिळाली.” असं श्वेता शिंदेंनी सांगितलं.