प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं शुक्रवारी जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धांतच्या निधनाने संपूर्ण टीव्ही जगताला धक्का बसला आहे. सगळीकडे सिद्धांतच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धांतच्या संपूर्ण कुटुंबाला यामुळे धक्का बसला आहे. नुकतंच सिद्धांतची मुलगी डिझा हिने वडिलांसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर त्याची मुलगी डिझा हिने वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो गंमतीजमती करतानाचे असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ती फार भावूक झाली आहे.
आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने शेअर केला पहिला फोटो, पोस्ट व्हायरल

Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
govinda wife sunita reveals actor hit two girls in college
“एका मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकलं, तर दुसरीला…”, १८ व्या वर्षी सुनीताने केलेलं गोविंदाशी लग्न, ‘त्या’ प्रसंगानंतर झालेली पहिली भेट
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

डिझा सूर्यवंशीची पोस्ट

“मला अजूनही समजत नाही की मी काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी. आता मला माझ्याबद्दल काहीही सांगायचे नाही. पण माझे पूर्ण अस्तित्वच सुन्न झाले आहे. मी तुमच्यासाठी फार जास्त पजेसिव्ह आणि प्रोटेक्टिव होते. या पोस्टच्या शेवटी मी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात मी मजा मस्ती करत आईला तुमच्यापासून दूर करत आहे. माझ्या वडिलांना हात लावू नकोस, ते फक्त माझे आहेत, असेही मी तिला सांगत आहे. तुम्ही नेहमीच माझे चांगले मित्र राहिले आहात. तुम्ही माझी प्रत्येक समस्या ऐकून घेतलात. मला तुम्ही अनेक विषयांवर सल्ले दिलेत. तुम्हाला कायमच माझा अभिमान वाटायचा, असे तुम्ही वारंवार सांगायचा.

तुम्ही मला कायमच विश्वास दिला आहे की, मी आयुष्यात सर्वकाही करण्यास सक्षम असायला हवं. मी तुम्हाला भविष्याबद्दल अनेक वचनं दिली होती, पण आता मात्र ती मी पूर्ण करु शकणार नाही. पण एवढं मात्र नक्की की, तुम्हाला अभिमान वाटेल असे मी काही तरी करुन दाखवेन. यासाठी मेहनत करेन. तुम्ही अनेकदा म्हणता ना की मी काहीही लहान किंवा मोठी कामगिरी केल्यावर तुम्हाला माझा अभिमान वाटायचा. मला माहिती आहे की आता तुम्ही आमच्याबरोबर शारिरिकदृष्ट्या नाही. पण माझ्या प्रत्येक चांगल्या कामगिरीवर तुम्ही फार हसून मला प्रतिक्रिया द्यायचा. “माझी गुंडी राणी किती मोठी झालीय, पप्पूचे हृदय अभिमानाने भरलेले आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे गुगली.” असं तुम्ही कायमच म्हणायचा. तुम्ही मला इतकी टोपणनावं दिली होती की मला तेव्हा त्याची लाज वाटत होती, पण आता माझी इच्छा आहे की तुम्ही मला पुन्हा त्या नावांनी हाक माराल.

आय लव्ह यू अप्पा, मला तुमची खूप आठवण येते. तुम्ही असेच आनंदात राहा आणि मला कायम मार्गदर्शन करत राहा कारण मला तुमची सदैव गरज आहे, हे तुम्हाला माहितीच आहे”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : जिम ट्रेनरने दिलेला व्यायाम न करण्याचा सल्ला पण… सिद्धांतच्या निधनाबाबत समोर आली नवी माहिती

दरम्यान सिद्धांत वीर सूर्यवंशीने ‘कसौटी जिंदगी की’,‘जिद्दी दिल माने ना’, ‘ममता’, ‘ज़मीन से आसमान तक’, ‘विरोध’, ‘भाग्यविधाता’, ‘क्या दिल में है’, ‘गृहस्थी’ . टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

Story img Loader