Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरने काही दिवसांपूर्वीच ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ या ‘स्टार प्रवाह’वरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली. शोमध्ये अभिनेता नेहमीच सर्वांचं मनोरंजन करत असतो, अनेकदा लहानग्या स्पर्धकांना आणि परीक्षकांना सिद्धार्थ सरप्राइज देत असतो. मात्र, आता दिवाळीच्या सणानिमित्त खास आदर्श शिंदेने सिद्धार्थला एक गोड Surprise दिलं आहे.

‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद ३’ या शोच्या रंगमंचावर सिद्धार्थ चांदेकरचे कुटुंबीय त्याला भेटण्यासाठी येणार आहेत. अभिनेत्याची पत्नी मिताली मयेकर, त्याची आई सीमा चांदेकर आणि त्याचे सावत्र वडील नितीन म्हसवडे असे सगळे सहकुटुंब या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
shivani rangoli birthday mother in law mrinal Kulkarni writes special post
लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”
marathi actors visited prarthana behere new home in alibaug
प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अभिनेत्रीच्या अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समोर
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

हेही वाचा : प्रार्थना बेहेरे इथेच राहतात का? अलिबागच्या नव्या घरात पोहोचले पूजा सावंतसह सगळे मित्रमंडळी, व्हिडीओ आला समो

सिद्धार्थ चांदेकरच्या ( Siddharth Chandekar ) आईने गेल्यावर्षी दुसरं लग्न केलं. अभिनेत्याने बायको मितालीच्या साथीने आईचं दुसरं लग्न लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. याचे फोटो सोशल मीडियावर देखील बरेच व्हायरल झाले होते. यानंतर हे कुटुंबीय पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर एकत्र आले आहेत.

सर्वप्रथम सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकर रंगमंचावर येते. हे दोघंही एकमेकांना मिठी मारतात. यानंतर मागून आई आल्याचं पाहताच सिद्धार्थ एकदम भारावून जातो. सोबतीला त्याचे सावत्र वडील नितीन म्हसवडे सुद्धा त्याला सरप्राइज देण्यासाठी आलेले असतात. सिद्धार्थ आमच्या कुटुंबाचे नवे सदस्य असं सांगत सर्वांना त्यांची ओळख करून देतो. तसेच हे दोघंही एकमेकांना खूप चांगली साथ देतात असंही सिद्धार्थ यावेळी म्हणाला.

हेही वाचा : सूरज चव्हाण ‘या’ दिवशी हक्काच्या घरात प्रवेश करणार! भर सभेत अजित पवारांनी दिला शब्द; म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”

सिद्धार्थचे ( Siddharth Chandekar ) सावत्र वडील नितीन यावेळी म्हणाले, “आयुष्याच्या व्याकरणातील सगळे नियम आता मोडलेत आणि आता आम्ही सगळेजण एकमेकांसाठी सर्वस्व आहोत” असं त्यांनी सांगितलं. पुढे, सिद्धार्थच्या आईने दिवाळीनिमित्त लाडक्या लेकाचं औक्षण देखील केलं.

दरम्यान, सिद्धार्थच्या ( Siddharth Chandekar ) चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळे प्रेक्षक व शोचे परीक्षक देखील आनंदी झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ अशा चित्रपटांमध्ये झळकला होता. आता येत्या काही काळात अभिनेता आणखी कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader