अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. सोशल मिडियावर सक्रिय राहून तो त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. नुकतंच त्याच्या आईने दुसरं लग्न केलं आहे. तर आता त्यांच्या पतीचं नाव काय आहे हे समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल सकाळी सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याने त्याची आई सीमा चांदेकर यांचा त्यांच्या पतीबरोबरचा एक फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली. यानिमित्त त्याने एक खास कॅप्शनही लिहिली. सिद्धार्थने त्याच्या आईच्या लग्नाची बातमी सोशल मिडियावरून सांगताच त्याबद्दल नेटकरी विविध प्रतिक्रिया देऊ लागले. त्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं. तर काहींनीही सिद्धार्थच्या आईच्या पतीचं नाव काय हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता हे दाखवली.

आणखी वाचा : सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, नेटकरी म्हणाले, “इतका मोठा निर्णय घेण्यासाठी…”

तर काल मितालीने शेअर केलेले आहे एका फोटोमधून त्यांचं नाव काय आहे हे कळलं आहे. काल सकाळी मितालीने या लग्नाचे काही फोटो शेअर करत सासूबाईंसाठी खास पोस्ट लिहिली होती. त्याच्या शेवटी “तुला आणि नितीन काकांना खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा.” असं तिने लिहिलं. तर काल रात्री तिने या लग्नाचे आणखी काही फोटो तिच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले. यात लग्नाच्या हॉलच्या बाहेर लावलेली त्या दोघांच्या नावाची पाटी दिसत आहे. त्यावर “चांदेकर = म्हसवडे” असं लिहिलं आहे. तर त्यावरून सिद्धार्थच्या आईच्या पतीचं नाव नितीन म्हसवडे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : “…म्हणून मी गायक होऊ शकलो नाही,” व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ चांदेकरने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान आता सिद्धार्थ चांदेकर याची आई अभिनेत्री सीमा चांदेकर यांच्यावर सर्वत्र अभिनंदन असा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनी याचबरोबर नेटकऱ्यांनी सिद्धार्थ आणि मितालीच्या पोस्टवर कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth chandekar mother got married for the second time know her husband name rnv