मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला ओळखले जाते. सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच मिताली मयेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट पाहून अनेकांची तारांबळ उडाली. काल मुंबईसह काही परिसरात विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. नुकतंच मितालीने तिच्या इन्स्टाग्रामवर विजांच्या कडकडाटाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर तिने विजांच्या कडकडाटाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहेत.
आणखी वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शन चर्चेत
तसेच तिने इन्स्टाग्रामला एक स्टोरीही पोस्ट केली आहे. त्यात तिने वीज चमकतानाचा फोटो शेअर केला आहे. “हे देवा, आम्ही जे काही केलं आहे, त्यासाठी आम्हाला खरंच माफ कर”, असे तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे. त्याबरोबरच तिने “कृपया हे थांबवा” असे म्हणत आणखी एक फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान मितालीने वयाच्या १३ व्या इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून झळकली. त्याबरोबर ती ‘उर्फी’ या चित्रपटातही दिसली होती.
आणखी वाचा : “हे फोटो टाकणं…” पत्नीने अंघोळ करताना शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट
तसेच २०१६ मधील ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून तिने सायली बनकर नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याबरोबर हल्लीच मितालीने टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन केले. तिने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ‘कस्तुरी साटम’ हे पात्र साकारले होते.