हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर ‘झिम्मा’ चित्रपटाचा दुसऱ्या भाग २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राइज मिळालं आहे.

सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर आणखी दोन अभिनेत्रींची एंट्री ‘झिम्मा २’मध्ये झाली आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या नव्या पोस्टरमधून याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे आता रिंकू आणि शिवानीची भूमिका काय असणार?, यावेळी कथा काय असणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळणार आहेत.

Dharmaveer movie shiv sena hindutva
शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Janhvi Kapoor share Sridevi and boney Kapoor memories
लग्नानंतर श्रीदेवी भांडायला शिकल्या होत्या, जान्हवी कपूरने केला खुलासा; वडिलांबाबत म्हणाली, “ते आधीच…”
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Bengaluru Mahalaxmi Murder body stored in fridge
Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय
young CA girl at Ernst & Young reportedly died from work stress
पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “

हेही वाचा – Video: “बघा एकदा करून…” ऐश्वर्या नारकर यांनी नातं पुनर्जीवित कसं करायचं? यासंबंधित दिला मोलाचा सल्ला, म्हणाल्या…

हेही वाचा – नव्या घराचं डाउन पेमेंट व EMIसाठी केतकी माटेगावकरने ‘अशी’ केली काटकसर, म्हणाली…

अशातच या नव्या पोस्टवरील चाहतीच्या एका प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने ‘झिम्मा २’चा नवा पोस्ट पाहून विचारलं की, अगं बाई पाटील आर्ची एडिशन आहे का…यात..मग परश्याची भूमिका सिद्धार्थ करतोय का?…थोडी मज्जा. चाहतीच्या या प्रतिक्रियेवर दिग्दर्शक हेमंत ढोमेने मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, “हो.. या बायांमुळे तो विहिरीत उडी मारणारच आहे एकदिवस…काय रे सिद्धार्थ?”

हेही वाचा – “तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे?” चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देत ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू म्हणाली…

दरम्यान, ‘झिम्मा २’ या चित्रपटाची प्रस्तुती हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’च्या सहकार्याने जिओ स्टुडिओज करणार आहेत. तर चलचित्र मंडळी, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.