अनेकदा पडद्यामागचे क्षण प्रेक्षकांना भुरळ घालत असतात. कलाकार एकमेकांबरोबर मजा-मस्ती करताना दिसतात. अशा प्रकारे पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळते. सोशल मीडियामुळे प्रेक्षकांना कलाकारांविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळते. अनेक कलाकार पडद्यामागचे हे क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav)देखील दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका

आता होऊ दे धिंगाणा हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम लोकांच्या आवडत्या शोपैकी एक आहे. त्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमधील कलाकारांना आमंत्रित केले जाते. त्यांच्याबरोबर अनेक खेळ खेळले जातात. त्यांना विविध टास्क दिले जातात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळे टास्क मजेशीर असतात. कलाकारांबरोबरच प्रेक्षकांनाही हे कार्यक्रम पाहताना मजा येते. आता अभिनेता ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतील अभिजीत आमकरने सोशल मीडियावर ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये आई मला नेसव शालू नवा हे गाणे ऐकायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला मालिकेतील कलाकार दिसत आहेत. रूपल नंद, शर्वरी जोग, आशुतोष गोखले हे कलाकार त्यात पाहायला मिळतात. त्यानंतर स्टेजवर सिद्धार्थ जाधव येतो. तो स्टेजवर आल्यानंतर त्याने या लावणीवर ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ जाधवला या लावणीवर थिरकताना पाहून अभिजीत आमकरने त्याला साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ व अभिजीतचा डान्स पाहून सेटवरील कलाकार शेवटी टाळ्या वाजवून दाद देत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करीत अभिनेत्याने सिद्धार्थ जाधवचे कौतुक केले आहे. तसेच हे पडद्यामागचे क्षण आवडले असून, अनपेक्षित असल्याचेदेखील त्याने म्हटले आहे.

दरम्यान, सिद्धार्थ जाधव ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. अनेकदा इतर कलाकारांबरोबर तो मजा-मस्ती करताना दिसतो. नुकताच तो सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता तो आणखी कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth jadhav dance on aai mala nesav shalu nava lavani with tuhi re majha mitwa fame actor abhijit amkar shares bts of aata hou de dhingaana nsp