अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’, मराठी मालिकाविश्वात नंबर वन मालिका आहे. ५ डिसेंबर २०२२ला सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. सायली, अर्जुन, प्रिया, अस्मिता, कल्पना, पूर्णाआजी मालिकेतील ही पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. दर आठवड्याला येणाऱ्या टीआरपीच्या यादीत ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी ठाण मांडून आहे. उद्या या मालिकेचा वर्ष पूर्ण होत आहे. अशातच ‘ठरलं तर मग’ला टक्कर देण्यासाठी एक टीम सज्ज झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हो, हे खरं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेला टक्कर देण्यासाठी प्रव्हेंजर्स येणार आहेत. ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘ठरलं तर मग’ मालिका विरुद्ध प्रव्हेंजर्स यांच्यात सांगीतिक लढत होणार आहे. याचा प्रोमो काही तासांपूर्वी स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – माधुरी दीक्षितने सांगितली मुलांच्या संगोपनासाठी महत्त्वाची गोष्ट, अभिनेत्री म्हणाली, “मुलं कोणत्या….”

या प्रोमोमध्ये, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीम टक्कर देण्यासाठी स्टार प्रवाहवरील जुन्या मालिकेतील कलाकार पाहायला मिळत आहेत. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील सूर्या दादा, पश्या, ‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा-कार्तिक, ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू, ‘स्वाभिमान’मधील पल्लवी, ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार म्हणजेच प्रव्हेंजर्स ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी टक्कर देणार आहेत. ‘आता होऊ दे धिंगाणा २’ या आठवड्यात ही सांगीतिक लढत होणार आहे. आता ही लढत कोण जिंकणार? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.

हेही वाचा – शिवानी सुर्वेला दोन-तीन दिवसांतच ‘या’ लोकप्रिय हिंदी मालिकेतून टाकलं होतं काढून, अभिनेत्री स्वतः किस्सा सांगत म्हणाली…

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “व्वा अप्पू पुन्हा आली”, “अप्पू आणि पल्लवीला पाहून आनंद झाला”, “उत्सुकता आहे”, अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth jadhav show aata hou de dhingana 2 new promo out tharla tar mag pps