‘स्टार प्रवाह’वर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एक भन्नाट कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला. तो म्हणजे ‘आता होऊ दे धिंगाणा’. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवने यशस्वीरित्या सांभाळली होती. या कार्यक्रमातून दोन मालिकेच्या टीममध्ये अनोखी सांगितिक लढत पाहायला मिळायची. हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. फेब्रुवारी २०२३मध्ये या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आता पुन्हा एकदा लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा – ‘स्टार प्रवाह’वर लवकरच येणार नवी मालिका; निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकरने केलं जाहीर

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?

‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा २’चा जबरदस्त प्रोमा शेअर केला आहे. ज्यामध्ये सिद्धार्थ जाधव पाहायला मिळत आहे. याचा अर्थ नव्या पर्वाचे देखील सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधवचं करणार आहे, हे निश्चित झालं आहे.

हेही वाचा – मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील ‘हे’ ठिकाण गौतमी पाटीलला आवडतं; म्हणाली…

‘आता होऊ दे धिंगाणा’चं हे नवं पर्व २१ ऑक्टोबरपासून दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुनची एक भुवई का असते वर? निर्मिती सावंत यांनी सांगितलं त्यामागचं रहस्य

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल वैद्यच्या मुलीची पहिली झलक समोर; बहिणीने केला फोटो शेअर

‘आता होऊ दे धिंगाणा २’चा नवा प्रोमो पाहून कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री गिरीजा प्रभू, साक्षी गांधी, नंदिता पाटकर, अभिषेक रहाळकर यांसह बऱ्याच कलाकारांनी प्रोमोवर प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “व्वा आता मज्जा येणार… हा कार्यक्रम पुन्हा येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. आता या कार्यक्रमात सार्थक आणि आनंदीला पाहू शकणार आहे.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “खूपच उत्सुकता आहे.” तसेच एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “याचीच तर वाट बघत होतो.”

Story img Loader