Siddharth Jadhav Wife Trupti New Business : नवीन वर्षात काहीतरी वेगळं, हटके करायचं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. अशाच अनेक आशा-आकांशा घेऊन संपूर्ण जगभरात २०२५ या नवीन वर्षांचं स्वागत करण्यात आलं. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या कुटुंबांसह वेळ घालवत या नव्या वर्षाची सुरुवात केली. तर, काही कलाकारांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या चाहत्यांना आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवने देखील आपल्या तमाम चाहत्यांबरोबर नुकतीच एक गुडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्याच्या पत्नीने या नवीन वर्षात स्वत:चा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

२०२४ च्या डिसेंबर महिन्यात सिद्धार्थची पत्नी तृप्तीने सोशल मीडियावर ‘Something New Coming’ अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना नव्या बिझनेसची हिंट दिली होती. आता तृप्तीने तिच्या नव्या व्यवसायाची पहिली झलक सर्वांना दाखवली आहे.

sonali kulkarni bought new new mercedes benz car
सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Nupur Shikhare Ira Khan Trending Marathi Reel Viral
Video: ‘आले तुफान किती…’ म्हणत नुपूर शिखरेचं पत्नी आयरा खानबरोबर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar emotional after met daughter watch promo
Bigg Boss 18: ८६ दिवसांनंतर लेकीला पाहून शिल्पा शिरोडकर ढसाढसा रडली, किस करताच अनुष्का मराठीत म्हणाली, “मी मेकअप लावलाय…”

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, ‘या’ गाजलेल्या मालिकेत केलंय काम

सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट

तृप्ती ही बिझनेसवुमन म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी तृप्तीने ‘स्वइरा’ हा तिचा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. यानंतर आता तृप्तीने आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अलिबागमध्ये तिने सुंदर असा होमस्टे सुरू केला आहे. ‘तृप्ती कॉटेज’ असं तिच्या नव्या व्यवसायचं नाव आहे. अलिबागला जाणारे पर्यटक या होमस्टेमध्ये राहू शकतात. तृप्तीने हा ३ बीएचके व्हिला अतिशय सुंदर पद्धतीने डिझाइन केला आहे.

सिद्धार्थ पत्नीचं कौतुक करत लिहितो, “अभिनंदन तृप्ती… आज तुझं स्वप्न पूर्ण झालं आहे. तुझं स्वप्न सत्यात उतरलं यासाठी मी खूप आनंदी आहे. गॉड ब्लेस यू” अभिनेत्याने या पोस्टवर ‘तृप्ती कॉटेज’ आणि ‘पिवळा बंगला’ असे हॅशटॅग्ज वापरले आहेत.

हेही वाचा : ‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…

हेही वाचा : Video : ‘पुष्पा २’मधील गाण्यावर डान्स करत ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी नवीन वर्षाचं केलं स्वागत, शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाल्या…

Siddharth Jadhav
सिद्धार्थ जाधवची पोस्ट ( Siddharth Jadhav Wife New Business )

दरम्यान, सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या आता ‘होऊ दे धिंगाणा’ या शोच्या तिसऱ्या पर्वाचं होस्टिंग करत आहे. या शोला प्रेक्षकांची सुद्धा भरभरून पसंती मिळत आहे.

Story img Loader