Mulgi Zali Ho Fame Marathi Actor Siddharth Khirid : मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांनी गेल्या काही दिवसांत लग्नगाठ बांधल्याचं पाहायला मिळालं. तर, काही सेलिब्रिटींनी प्रेमाची जाहीर कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता सिद्धार्थ खिरीडने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी देत सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये सिद्धार्थ ( Siddharth Khirid ) झळकलेला आहे. याशिवाय काही चित्रपटांमध्ये देखील सिद्धार्थने काम केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. आता वर्षाखेरीस अभिनेत्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करत सोशल मीडियावर प्रेम व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : The Sabarmati Report OTT Release: आता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कुठे, कधीपासून जाणून घ्या…

सिद्धार्थ खिरीडने शेअर केले रोमँटिक फोटो

सिद्धार्थ खिरीडने ( Siddharth Khirid ) इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसह रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या दोघांच्या बॅकग्राऊंडला हार्ट शेपमध्ये सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केल्याचं पाहायला मिळत आहे. या रोमँटिक फोटोंना कॅप्शन देत सिद्धार्थ लिहितो, “फक्त २०२४ हे वर्ष संपत नाहीये तर, माझ्या आयुष्यातील ‘सिंगल’ अध्याय सुद्धा आता संपलेला आहे. #EndingSingleEra” सिद्धार्थला या कॅप्शनद्वारे तो आता सिंगल नसून त्याच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री झालेली आहे असं सूचित करायचं आहे.

सिद्धार्थने प्रेमाची कबुली देत आपल्या गर्लफ्रेंडचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्याची जोडीदार नेमकी कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे नेटकरी सिद्धार्थच्या फोटोंवर ‘ती कोण आहे’ अशा कमेंट्स करत त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल विचारपूस करत आहेत. अभिनेत्री योगिता चव्हाणने सुद्धा सिद्धार्थच्या फोटोंवर, “अभिनंदन Sid, मला सांग नंतर कोण आहे ती” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा : “लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल…”, नव्या मालिकेविषयी काय म्हणाल्या हर्षदा खानविलकर? ‘ती’ इच्छा खरी ठरली…

दरम्यान, सिद्धार्थ खिरीडच्या ( Siddharth Khirid ) फोटोंवर मधुरा जोशी, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, अमृता देशमुख, रश्मी अनपट, सानिका काशीकर, स्वाती देवल, गौरी नलावडे, संचित चौधरी या कलाकारांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. आता अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल केव्हा खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.