बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमानच्या भावाचे पात्र अभिनेता सिद्धार्थ निगम साकारत आहे. नुकतंच सिद्धार्थ निगमने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे.
सिद्धार्थ निगम आणि तुनिषा शर्मा यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यात एकत्र काम केले होते. या दरम्यान ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. नुकतंच एका वेबपोर्टलला सिद्धार्थ निगमने मुलाखत दिली. या मुलाखतीत सिद्धार्थ निगमला तुनिषाबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल तो म्हणाला, “तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस आधी मी तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोललो होतो. पण जेव्हा तिच्या मृत्यूची बातमी मला समजली, तेव्हा मला खूपच धक्का बसला. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो.”
आणखी वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझानच्या मेकअप रुममध्ये सापडली चिठ्ठी, त्यावर लिहिलंय…
“माझ्यासाठी तो क्षण फारच निराशादायक होता. मी तेव्हा चित्रपटाचे शूटींग करत होतो. त्यावेळी जस्सी पाजी यांना तिचा व्हिडीओ कॉल आला होता. ते दोघेही एकत्र एका म्युझिक व्हिडीओबद्दल बोलत होते. मी तेव्हा तब्बल १ वर्षांनी तुनिषाशी बोललो होतो. ती खूपच आनंदात होती. ती आम्हा सर्वांना भेटण्याचा प्लॅन करत होती.” असे सिद्धार्थ निगमने म्हटले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी वर्कआऊट करत होतो, तेव्हा मला तुनिषाबद्दलची माहिती मिळाली. तेव्हा मला वाटलं की हा एक प्रँक कॉल असावा. पण ते खरं होतं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. अनेक लोक तिच्यावर खूप प्रेम करायचे. या वेदनांचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे”, असे सिद्धार्थ निगमने म्हटले.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
दरम्यान टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. २० वर्षीय अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला.