Sidharth Shukla Shehnaaz Gill : छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात करणारा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा आज ४४ वा वाढदिवस आहे. त्याने ‘बालिका वधू’सह अनेक शोमध्ये काम केले होते. त्यानंतर त्याने ‘बिग बॉस १३’ चे विजेतेपद मिळवले होते. सिद्धार्थचे चाहते आजही त्याची खूप आठवण काढतात आणि सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि शहनाज गिलचे चाहते आजही त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात सिद्धार्थ आणि शहनाज यांची मैत्री आणि खास बॉन्डिंग चाहत्यांना आजही लक्षात आहे. सिद्धार्थ शुक्ला हा हॅशटॅग त्याच्या वाढदिवशी सोशल मीडिया एक्सवर(पूर्वीचे ट्विटर) ट्रेंड करत आहेत. त्याचवेळी, या खास दिवशी शहनाज गिलनेही एक पोस्ट केली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा…कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”

शहनाजने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली

अभिनेत्री शहनाज गिल दिवंगत अभिनेत्याच्या वाढदिवशी भावुक झाली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर (एक्स आणि इन्स्टाग्राम) १२:१२ लिहून पोस्ट शेअर केली आहे,ही पोस्ट सिद्धार्थची जन्मतारीख आणि महिना दर्शवते. यावरून शहनाजला आजही सिद्धार्थची खूप आठवण येते हे लक्षात येते. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

शहनाजच्या पोस्टवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “शहनाजच ट्विट भावूक करणारे आहे. हॅप्पी बर्थडे सिद्धार्थ, तुझी खूप आठवण येते.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “ तू तुझ्या आयुष्यात जे काम करत आहेस ते सिड पाहत असेल आणि त्याला तुझ्यावर खूप अभिमान वाटत असेल. आम्हाला सिडचा खूप अभिमान आहे.” तर आणखी एका युजरने लिहिले, “हे मला खूप भावूक करणारं आहे. तुझ्या एका ट्विटमुळे माझ्या डोळ्यांत पाणी आलं. नेहमी आनंदी राहा, कारण ज्यांची आपल्याला खूप आठवण येते, ते कुठेच जात नाहीत; ते नेहमी आपल्याबरोबरच असतात.”

शहनाजने सिद्धार्थसाठी केलेल्या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Shehnaaz Gill X Account)

हेही वाचा…प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची पहिली भेट ‘बिग बॉस १३’मध्ये झाली होती. या शोमध्ये लोकांनी त्यांची मैत्री, प्रेम आणि भांडणे पाहिली पण त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. हा सीझन सर्वात हिट सीझनपैकी एक ठरला होता, या सीझनमध्ये शहनाज गिल सेकंड रनरअप ठरली, तर दुसरीकडे दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या सीझनचे विजेतेपद पटकावले होते. सिद्धार्थ शुक्लाचे २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth shukla birth anniversary shehnaaz gill share a post fan reacted psg