हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं ( Sidharth Shukla ) २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झालं. ‘खतरों के खिलाडी’चं सातवं पर्व आणि ‘बिग बॉस’चं १३ पर्व जिंकणारा सिद्धार्थ आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात फराह खानने सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख केला होता. ‘बिग बॉस’च्या घरातील सिद्धार्थचा खेळ अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्याचे सोशल मीडियावर नेहमी फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात.

१२ डिसेंबरला सिद्धार्थ शुक्लाचा ( Sidharth Shukla ) जन्मदिवस होता. या दिवशी सिद्धार्थच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसंच सिद्धार्थची खास मैत्रीण शहनाज गिलने देखील खास पोस्ट शेअर केली होती. सिद्धार्थची आई रीता यांनी आपल्या लाडक्या लेकाचा जन्मदिवस त्याच्या आठवणीत साजरा केला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

हेही वाचा – Video: वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौलींचा भन्नाट डान्स, पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, तरुणाईला लाजवेल अशी दिग्दर्शकाची एनर्जी

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सिद्धार्थ शुक्लाची ( Sidharth Shukla ) आई केक कापताना भावुक झालेली पाहायला मिळत आहे. रीता यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर आणि सिद्धार्थच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जन्मदिवस साजरा केला. पण यामध्ये शहनाज गिल कुठेही दिसली नाही. त्यामुळे चाहते प्रतिक्रियेच्या माध्यमातून शहनाजबद्दल विचारताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली…

दरम्यान, सिद्धार्थ शुल्काच्या ( Sidharth Shukla ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘बालिका वधू’, ‘दिल से दिल तक’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यानं काम केलं होतं. ‘बिग बॉस’चं १३वं पर्व जिंकल्यानंतर सिद्धार्थ अधिक प्रसिद्धीझोतात आला. तसंच त्याच्या करिअरला आणखी उभारी आली. पण, नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. २ सप्टेंबर २०२१ रोजी अचानक सिद्धार्थच्या निधनाची बातमी समोर आली. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. आता सिद्धार्थच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, त्याच्या आठवणी कायम चाहत्यांच्या स्मरणात आहेत.

Story img Loader