अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका सध्या सुरू आहे. ‘कलर्स मराठी’वरच्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेचं नवं पर्व उद्यापासून सुरू होतं आहे. त्यामुळे छोट्या चिंधीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेतील आतापर्यंतच्या प्रवासाचा व्हिडीओ छोटी चिंधी म्हणजेच बालकलाकार अनन्या टेकवडेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: रवी जाधव यांचे भाऊ अजूनही चालवतात रिक्षा; ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मंचावर दिग्दर्शकांनी सांगितला किस्सा…

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत सुरुवातीला सिंधुताईंच्या बालपणीचा प्रवास म्हणजेच छोट्या चिंधीची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्यानंतर आता सिंधुताईच्या चरित्रगाथेचा पुढचा अध्याय सुरू होत आहे. छोटी चिंधी आता मोठी झाल्याचं पाहायला मिळणार आहे. आता सिंधुताईच्या भूमिकेत अनन्या ऐवजी अभिनेत्री शिवानी सोनार झकळणार आहे. अनन्याचा या मालिकेतील प्रवास आता संपला आहे. याच निमित्ताने अनन्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही नवी मालिका ‘या’ मालिकेचा रिमेक?

अनन्याने पोस्टमध्ये लिहीलं, “वन लास्ट टाईम चिंधी म्हणून तयार होताना…सिंधूताई यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचे बालपण दाखवण्याची संधी मला चिंधी या पात्रातून दिल्याबद्दल मी कलर्स मराठी चॅनेल, विराज राजे सर, निर्माते मंगेश जगताप सर व शीला मॅम, इ पी जयश्री मॅम, विजय देवकर सर, संपूर्ण प्रोडक्शन टीम, आमचे दिग्दर्शक विठ्ठल डाकवे सर, पूर्ण दिग्दर्शन टीम, डीओपी रुपेश सर , महेश सर, हेअर मेकअप कॉस्च्युम टीम, स्पॉट, लाईट चे संपूर्ण युनिट यांचे आभार मानते.”

हेही वाचा – स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद?, प्रेक्षकही म्हणाले, “अखेर तो क्षण आला…”

हेही वाचा – अवघ्या तीन महिन्यातच गुंडाळावी लागली ‘ही’ मालिका; अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप

दरम्यान, ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत अभिनेते किरण माने यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री योगिनी चौक सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रिया बेर्डे यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका साकारली आहे.

Story img Loader