मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते म्हणून अवधूत गुप्ते हा सतत चर्चेत असतो. प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या गाण्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अवधूत गुप्तेने कार्यक्रमातील परीक्षकांबद्दल एक खुलासा केला.

अवधूत गुप्तेने नुकतंच कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांना फक्त आणि फक्त चांगलंच बोलायचं, असं सांगितलं जातं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “गडकरी कमी अन् फडणवीस जास्त…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला…”

“मला अनेकदा असं विचारलं जातं की तुम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचे परीक्षण करता तेव्हा तु्म्ही जे बोलता, ते सर्व तुम्हाला लिहून दिलं जातं का? पण मला त्यांना सांगावसं वाटतं की आम्हाला असं काहीही लिहून वैगरे दिलं जात नाही. आम्हाला लिहून न देता बोलता येतं, म्हणून तिथे बसवतात, नाहीतर तिथे कोणीतरी सुंदरी बसवली असते. पण तिथे दाढी मिशीवाला एक माणूस बसवला आहे, तो दिसण्यासाठी नाही, बोलण्यासाठीच बसवला आहे”, असे अवधूत गुप्ते म्हणाला.

“त्यामुळे चॅनल असं काहीही सांगत नाही. ते कमेंट किंवा गुण यातलं काहीही सांगत नाही. त्यांनी जरी सांगितले, तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही. जर असं कुठे होतं असेल तर ते प्रेक्षकांना समजतं. अनेकवेळा काही लोकांच्या कानात एक मशीन असतं, ते मशीन तेच सांगण्यासाठी असतं. मी कधीच ते मशीन घेत नाही.

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मी ते वापरतो. कारण तिथे राज ठाकरे, नितीन गडकरी अशी दिग्गज मंडळी सहभागी होतात. त्यांना प्रश्न विचारताना तारांबळ उडते. त्यावेळी तुमच्यामागे चार लोक बसलेली असतात, ते तुम्हाला कानात हे विचार, ते विचार असं सांगत असतात. मी माझ्याकडून त्यांना काही सूचना देत असतो. पण मी त्या कार्यक्रमात परीक्षक नसतो. तिथे मी मुलाखतकार असतो. त्यामुळे त्यावेळी ते मशीन कानात घालायला काहीही समस्या नसतात. पण परीक्षक असताना जर तुम्हाला काय कमेंट द्यायची हे सांगत असेल तर तुम्ही परीक्षक कसले?” असेही अवधूत गुप्तेने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “भारतातील पहिला एक्सप्रेस वे अन् त्यासाठीची धडपड…”, बहुचर्चित ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाळासाहेब ठाकरेंचीही दिसली झलक

दरम्यान अवधूत गुप्ते हा सध्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून काम करत आहे. त्याबरोबरच तो त्याच्या आगामी ‘बॉईज ४’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

Story img Loader