पाच पर्व सुपरहिट झाल्यानंतर आता ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ असं या पर्वाचं नाव असेल. तर या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “मी ‘सूर नवा ध्यास नवा’चं सूत्रसंचालन करत आहे कारण…,” रसिका सुनीलने केलं स्पष्ट भाष्य, स्पृहा जोशीबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल म्हणाली, “मला तिचं…”

स्पृहा जोशीच्या ऐवजी रसिका सुनिल या कार्यक्रमाच्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन करणार असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले आहेत, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नसल्याने काही निराशा व्यक्त करत आहेत. पण आता या आगामी पर्वात स्पृहा दिसणार नसल्याबद्दल या कार्यक्रमाचा निर्माता आणि परीक्षक अवधूत गुप्तेला काय वाटतंय हे त्याने सांगितलं.

हेही वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आता दिसतो ‘असा’, दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत स्पृहा जोशी म्हणाली…

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्ते म्हणाला, “मी स्पृहाला नक्कीच मिस करेन. किंबहुना आताही मी तिला मिस करतच आहे. पण आता रसिकासारखं एक नवीन नाव आलं आहे. आतापर्यंतच स्पृहा काय बोलायची, त्याला माझी प्रतिक्रिया काय असायची किंवा माझ्या बोलण्यावर स्पृहाचं उत्तर काय असेल हे ठसलेलं होतं. पण आता तसं नाहीये. आता रसिकाबरोबर नवीन बॉण्डिंग होईल, ती कशी प्रतिक्रिया देईल, कसं सूत्रसंचालन करेल, त्याला आम्ही कशा प्रतिक्रिया देऊ यातून काहीतरी नाविन्य घडेल याची मला खात्री आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer avdhoot gupte gives his reaction and says how is he feeling for not having spruha joshi in sur nava dhyas nava new season rnv