‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत कार्तिकीने आई होणार असल्याची बातमी दिली. तेव्हापासून तिच्याविषयी चर्चा रंगली आहे. अशातच कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड यांना एका मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. यासंदर्भात गायिकेने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते कार्तिकी गायकवाडचे वडील पं. कल्याणजी गायकवाड यांनी १ एप्रिलला श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार प्रदान करण्यात आला. या खास क्षणाचे फोटो शेअर करत कार्तिकीने लिहिलं, “श्री संत एकनाथ महाराज स्वर मार्तंड पुरस्कार दिनांक १ एप्रिल २०२४ अयोध्येतील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद गिरी जी महाराज यांच्या शुभ हस्ते पं. कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे साक्षात श्री संत एकनाथ महाराज यांचेच आशीर्वाद आहेत.”

हेही वाचा – न्यूड सीन देण्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारने ठेवला तीन दिवसांचा उपवास अन् मग प्यायला 30ml वोडका, ‘अशी’ झाली होती अवस्था

पुढे कार्तिकीने लिहिलं, “या कार्यक्रमासाठी अनेक संत महंत मान्यवार उपस्थित होते. त्यामध्ये भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री…सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अमृताश्रम स्वामी (जोशी ) बि जे पी अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषारजी भोसले…तारकेश्वर गडाचे जळगावकर महाराज नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज…कार्यक्रमाचे आयोजक ह भ प संत एकनाथ महाराज मिशनचे संस्थापक अध्यक्ष ह भ प योगिराज जी महाराज गोसावी यांचे मनस्वी आभार अनेक अनेक धन्यवाद.”

हेही वाचा – ओळख, प्रपोज अन् मग होकार…; विजय चव्हाण व विभावरी जोशी यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

दरम्यान, आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी कार्तिकीला सध्या सातवा महिना असून मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. २०२०मध्ये कार्तिकीचं रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पुण्यात पारंपरिक पद्धतीने कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा झाला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी-रोनित आई-बाबा होणार आहेत.