Kartiki Gaikwad Baby Boy : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडच्या घरी नव्या सदस्याचं आगमन झालेलं आहे. लग्नानंतर चार वर्षांनी गायिकेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कार्तिकीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

कार्तिकी गायकवाड ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झाली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं. मराठी मनोरंजनसृष्टीतील असंख्य गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई झाली आहे.

हेही वाचा : जान्हवी कपूरच्या काकूचं पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विधान; म्हणाली, “संजयने आजवर अनेक महिलांना…

कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे यांना मुलगा झाला आहे. ही आनंदाची बातमी शेअर करत गायिका लिहिते, “इट्स अ बॉय…माझ्या गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.”

हेही वाचा : “मी गरोदर होते, आईचा व्हिसा अडकला”, मृणाल दुसानिसने सांगितला अमेरिकेतील कठीण काळ; म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

 Kartiki Gaikwad Blessed with Baby
कार्तिकी गायकवाडने शेअर केली पोस्ट

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार? उरले शेवटचे फक्त दोन दिवस…; मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

मार्च महिन्यात कार्तिकीने ती आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. डोहाळे जेवणाचे सुंदर फोटो कार्तिकीने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिने शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या व्हिडीओमध्ये कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक पाहायला मिळाली होती. आता प्रेक्षकांची ही लाडकी गायिका आई झाल्याने सर्व स्तरांतून कार्तिकीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वर्णी, टायगर श्रॉफच्या बहीणसह झळकणार ‘हे’ ११ सदस्य

दरम्यान, बाळाचा जन्म होण्याआधी कार्तिकीने “जे कुणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असावं आणि त्या बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची, धर्माची सगळ्यांची सेवा होवो. बाळ सुसंस्कृत होवो. आमच्यापरीने आम्ही त्याला किंवा तिला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करू आणि मुलगा होणार की मुलगी यापेक्षा ते जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल” अशी इच्छा व्यक्त केली होती.

Story img Loader