‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन प्रसिद्धीझोतात आले. संगीत क्षेत्रात दोघांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमापासून सुरु झालेली त्यांची मैत्री आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेश-मुग्धाने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती. लवकरच ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
हेही वाचा : एका दशकाचा संघर्ष, अपयशाने खचली पण ‘त्या’ तीन दिवसांनी बदललं आयुष्य; जाणून घ्या वामिका गब्बीबद्दल खास गोष्टी
मुग्धा वैशंपायनने प्रथमेश लघाटेच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केला आहे. दोघेही एकत्र ‘मर्मबंधातील ठेव’ हा संगीत कार्यक्रम करतात. या कार्यक्रमानिमित्त सध्या ते गोव्यात आहेत. गुरुवारी ‘मर्मबंधातील ठेव’चा हरमाळ येथे प्रयोग झाला होता. याची खास झलक गायिकेने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर केली होती. त्यानंतर आज प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त तिने रोमॅंटिक फोटो शेअर करत होणाऱ्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : “पाकिस्तानी कलाकारांनाही…” शाहरुख खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकीया यांचं ट्वीट चर्चेत
“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय मॅन” असं कॅप्शन मुग्धाने प्रथमेशसह शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. मुग्धाने शेअर केलेला फोटो रिशेअर करत प्रथमेशने “थॅंक्यू मुग्गा…” असं म्हटलं आहे.
हेही वाचा : Video: राजकीय वादाचा सिनेमाला फटका, आंदोलकांनी गोंधळ घालत अभिनेता सिद्धार्थचा कार्यक्रम पाडला बंद
दरम्यान, सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्यावर मुग्धा आणि प्रथमेशने सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं होतं. दोघांचीही पहिली भेट लिटिल चॅम्प्सच्या मंचावर झाली होची. या शोनंतर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.