प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून प्रेक्षक त्याला बघत आले आहेत. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं. तर आता सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. प्रथमेश खूप खवय्या आहे. पण तितकीच तो त्याच्या आहाराची काळजी घेतो. काही वर्षांपूर्वी तो ‘सा रे ग म प’मध्ये असताना त्याला सगळे ‘मोदक’ असं म्हणत होते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने १४ किलो वजन कमी केलं आहे. ते कसं केलं हे आता त्याने सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी त्यांचा एक फोटो शेअर करत ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्यामुळे सध्या ते अनेक मुलाखती एकत्र देत त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून बोलत आहेत. आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने वजन कमी करण्यासाठी काय काय केलं हे सांगितलं.

prajakta mali marathi actress reveals her weight
प्राजक्ता माळीचं वजन किती? भलंमोठं कॅप्शन लिहित केला खुलासा; म्हणाली, “लोक म्हणू लागलेत एवढी बारीक…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?
how to to Manage thyroid level
थायरॉइड कमी करण्यासाठी दररोज करा हा व्यायाम, Viral Video एकदा पाहाच
Dr. Ambedkar inspirational quotes for Mahaparinirvan Din 2024 in marathi
Dr. Babasaheb Ambedkar Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘हे’ १० प्रेरणादायी विचार तुम्हाला आयुष्यात कधीही हरवू देणार नाहीत
How to belly fat in just 10 days with regular yoga practice
Belly Fat Loss : फक्त दहा दिवसात पोटाची चरबी अशी करा कमी, पाहा Viral Video

हेही वाचा : ‘अशी’ सुरु झाली मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी, म्हणाले, “घरी सांगितलं तेव्हा…”

तो म्हणाला, “मी डाएट १००% पाळतो आणि माझं डाएट आयुर्वेदिक पद्धतीचं आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या अशा दोन व्याख्या आहेत. त्यानुसार मी माझ्या आहारात बदल करतो. मी मैदा खाणं बंद केलं आहे आणि रात्री उशिरा जेवणंही मी बंद केलं आहे. कधी कधी आमच्या गाण्याच्या कार्यक्रमांमुळे आम्हाला रात्री उशीर होतो आणि गायल्यामुळे चांगलीच भूक लागते. अशावेळी मी उपमा किंवा खिचडी असं हलकं काहीतरी खातो.”

आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

पुढे व्यायामाबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी कधीच कुठेही जिम वगैरे लावलेली नाही. मी पारंपारिक पद्धतीने व्यायाम करतो आणि तो मी रोज करतो. सूर्यनमस्कार, दोरी उड्या, चालणं आणि प्राणायाम हा व्यायाम मी करतो. माझा एक भाऊ एमडी आयुर्वेद आहे त्याने मला हे सगळं प्लॅन करून दिलं आहे. तर माझ्यासारखंच डाएट मुग्धाही फॉलो करते.” डाएट आणि व्यायामाच्या बाबतीत प्रथमेशने मुग्धाला बरीच प्रेरणा दिली आहे असा खुलासा मुग्धाने केला. त्यामुळे प्रथमेशची ही फिटनेस जर्नी अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Story img Loader