इंडियन आयडल’च्या पहिल्याच पर्वातून घरोघरी पोहोचलेला गुणी गायक राहुल वैद्य हा सोशल मिडियावर चांगलाच सक्रिय आहे. राहुल जरी चित्रपटासाठी पार्श्वगायन करत नसला तरी त्याचे खासगी कार्यक्रम, कॉन्सर्ट, हे सुरूच असतात शिवाय मध्यंतरी बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्येसुद्धा स्पर्धक म्हणून हजेरी लावली होती. राहूल आपल्या फिटनेसला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. नुकतचं राहूलने सोशल मीडियावर आपल्या अॅब्सचा फोटो शेअर केला आहे. तसेच फिट राहण्यासाठी नेमकं तो काय काय करतो याबाबतही खुलासा केला आहे.
हेही वाचा- वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”
राहूल म्हणाला, पाठीच्या दुखण्यामुळे तो व्यायाम करु शकत नाही. त्यामुळे तो आपल्या डाएटकडे विशेष लक्ष देतो. राहूल रोज १८ तास उपवास करतो. तर आठवड्यातून एकदा तो केवळ पाणी पितो राहूलने आपल्या अॅब्सचा फोटो शेअर करत लिहलं आहे. “मी खरोखर पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे, ज्यामुळे माझी पाठ खरोखर कमकुवत झाली आहे आणि यामुळे मी व्यायाम करू शकत नाही. माझे वजन वाढत होते. म्हणून मी विचार केला की जर मी कॅलरीज बर्न करू शकत नाही तर मी अतिरिक्त खाणं बंद करु शकतो.
हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली…
राहुल पुढे म्हणाला, “जेव्हा मी उपवासाबद्दल वाचले तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण त्याचे बरेच फायदे आहेत. मी जवळपास दीड महिन्यापासून उपवास करत आहे. मी आठवड्यातून एकदा २४ तास उपवास करतो, कारण मला वाटते की ते पेशींच्या पुनरुत्पादनासाठी चांगले आहे.
राहुल वैद्य आणि त्याची बायको अभिनेत्री दिशा परमार लवकर आई-बाबा होणार आहे. काही दिवासंपूर्वी दिशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. दिशानं तिचा नवरा राहुल वैद्य याच्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. राहुल आणि दिशानं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोत दिशा तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. त्याबरोबर त्या दोघांनी सोनोग्राफीचा एक फोटो आणि व्हिडीओही शेअर केला होता. यात त्या दोघांनी बाळाची पहिली झलकही दाखवली होती.