रोहित राऊत मराठीतील लोकप्रिय गायक आहे. रोहितने २०२२ साली गायिका जुईली जोगळेकरबरोबर लग्नगाठ बांधली. रोहित व जुईली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनेकदा दोघे आपल्या सोशल मीडियावरून धमाल, कॉमेडी व्हिडीओ शेअर करीत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, रोहित व जुईली अनेकदा एकत्र गाण्याच्या मैफिली करताना दिसतात. दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या आवाजाने दोघांनी अनेकांना मंत्रमुग्ध केले आहे. रोहित व जुईलीमधील भन्नाट केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. दरम्यान, जुईली सध्या काश्मीरला फिरायला गेली आहे. सोशल मीडियावर जुईलीने फिरतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

हेही वाचा- आघाडीची अभिनेत्री असलेल्या स्पृहा जोशीला एकेकाळी वाटायची ऑडिशनची भीती! म्हणाली, “घराबाहेर पडायचे अन्…”

एकीकडे काश्मीरमध्ये जुईली मजा-मस्ती करताना दिसत आहे; तर दुसरीकडे रोहित राऊत बायकोच्या आठवणींत भावूक झाला आहे. रोहितने जुईलीच्या आठवणीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित गाणे गाताना दिसत आहे. रोहितने या गाण्यातून बायको घरी नसताना येणाऱ्या समस्या, तसेच मनातील भावना मांडल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करीत त्याने “ठीक आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे. आता घरी ये,” अशी कॅप्शनही दिली आहे. या व्हिडीओमध्ये रोहित भावूक होऊन रडताना दिसत आहे.

रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. जुईलीनेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये “फक्त दोन दिवस; मी घरी येणार आहे. मग मी पूर्णपणे तुझ्याबरोबर असेन. तुला त्रास देण्यासाठी, तुझे लाड करण्यासाठी, तुझ्या आजूबाजूला राहण्यासाठी, तुझ्या मिठीत झोपण्यासाठी मी तुझ्याकडे असेन. तुला माहीत आहे की, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू गायलेलं हे गाणं मला फार आवडलं आहे,” असे म्हटले आहे. जुईलीच्या या कमेंटवर रोहितने प्रतिक्रिया देत, “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” असे म्हटले आहे.