दहा-बारा वर्षांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे पर्व सुरू झालं आणि प्रचंड गाजलं. या पर्वामध्ये आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप पाच स्पर्धक ठरले. त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं. तर आताही ती पाच जणं नेहमीच चर्चेत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या पाच जणांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यांची नवनवीन गाणी घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतातच पण काही वर्षांपूर्वी आर्य आंबेकरने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. तर त्या पाठोपाठ आता रोहित राऊतही अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

रोहित राऊत सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. तर आता तो अभिनय करणार असल्याचं समोर आलं आहे. झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत त्याची एंट्री होणार आहे. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला. त्यातरोहितचीही खास झलक दिसली.

हेही वाचा : प्रथमेश लघाटेने कमी केलं १४ किलो वजन, सिक्रेट शेअर करत म्हणाला, “मी रोज…”

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. तर याचबरोबर आता त्याखाली कमेंट करत रोहितचे चाहते त्याला या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगत आहेत.