स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखलेलाही याच मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.

आई कुठे काय करते मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत अभिषेकची पत्नी अनघाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. देशमुख कुटुंबात कन्येचे आगमन झाल्यामुळे सगळेच आनंदी आहेत. परंतु, अभिषेकने विश्वातघात केल्यामुळे अनघावर मोठा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अरुंधती अनघाचे सांत्वन करताना तिच्यासाठी अंगाई गाताना दिसून आली. एकदा काय झाले या चित्रपटातील “बाळाला झोप का गं येत नाही” ही अंगाई अरुंधतीने गायली. हा चित्रपट मराठीतील सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. ही अंगाईही त्यांनीच लिहिली आहे.

हेही वाचा>>“तू त्याच्यापासून…”, अपूर्वा नेमळेकरच्या आईने अक्षय केळकरबद्दल केलं मोठं वक्तव्य

सलील कुलकर्णी यांनी मालिकेतील अरुंधतीचा अंगाई व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत मधुराणी गोखलेचं कौतुक केलं आहे. “बाळाला झोप का गं येत नाही… ‘एकदा काय झालं’मधली माझी अतिशय आवडती अंगाई…!! आज ‘आई कुठे काय करते’मध्ये  मधुराणी प्रभुलकर म्हणजेच मालिकेतल्या अरुंधतीला ती एका हळव्या प्रसंगी गाताना पाहून अनेक फोन आले…मेसेज आले…या क्षणाच्या सर्वात लोकप्रिय मालिकेत ‘एकदा काय झालं’मधलं हे गाणं घेणं ही पण गाण्याला आणि चित्रपटाला मिळालेली एक दादच आहे. मधुराणी..तू नेहमीच मन लावून गातेस ”, असं म्हणत त्यांनी स्टार प्रवाह व आई कुठे काय करते टीमचं आभार मानले आहेत.

हेही वाचा>>“शाहनवाजने लग्नात पैसे खर्च केले नाहीत म्हणून…”, ट्रोल करणाऱ्यांना देवोलिनाचं सडेतोड उत्तर

हेही वाचा>>प्राजक्ता माळीचं कौतुकास्पद काम; पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारल्यानंतर नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्यात मिळालं नामांकन

सलील कुलकर्णी यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत सलील कुलकर्णींनी चित्रपटातील हे गाणं पाहण्याची विनंती चाहत्यांना केली आहे.

Story img Loader