अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच त्यांनी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी अशोक सराफ यांनी स्पर्धक मुलांना भरभरून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत.

हेही वाचा : “पाटील म्हणतो नाव घे बाई…”, ‘हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने भर कार्यक्रमात घेतला हटके उखाणा, ऐकून व्हाल थक्क

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!

अशोक सराफ या महानायकाची भेट झाल्यावर सलील कुलकर्णी यांनी त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये गायकाने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत अशोक सराफ यांच्या जुन्या चित्रपटांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने मराठी कलाविश्वात कशी जादू केली होती हे सुद्धा त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : “तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सलील कुलकर्णी यांची पोस्ट

अशोक सराफ सर!
हे नाव पहिल्यांदा कधी ऐकलं असं आठवायला लागलो…मी शाळेत असतांना माझ्या आईने आम्हाला सायकलवरून विजय टॉकीजला “गोंधळात गोंधळ” पाहायला नेले होते तो दिवस आठवला.

दोन-चार महिन्यांतून एखादा चित्रपट पाहायला मिळायचा तेव्हा आधीच्या जाहिराती सुद्धा डोळे भरून बघितल्या जायच्या… ह्याची गम्मत आत्ता एकाच वेळी नेटफ्लिक्स वर पिक्चर , हॉटस्टारवर मॅच आणि प्राईमवर “फ्रेंड्स” बघणाऱ्यांना कळणार नाही .

“एक डाव भुताचा” मधले अशोक सराफ तर इतके आवडले की नंतर बरेच दिवस मी बुरुं असा आवाज काढून “मास्तुरे” असं म्हणत होतो… त्या चित्रपटानंतर डेक्कनवर खाल्लेला साधा डोसा आठवतो… साधा डोसा आणि अर्ध अर्ध गोल्ड स्पॉट मी आणि माझी बहीण…आईने नेहमीप्रमाणे त्याग करून फक्त इडली.

लक्ष्या बेर्डे – अशोक सराफ ह्यांनी धुमाकूळ घातलेला तो काळ… धुमधडाकामधले वाख्या वुक्खहू वाले अशोक सराफ आणि
मग बनवाबनवीमध्ये… हा माझी बायको…पासून… धनंजय माने इथेच राहतात का… आणि लिंबू कलरच्या साडीपासून ते कुणीतरी येणार येणार ग पर्यंत सगळं तोंडपाठ झालं ..

अशोकमामांच्या मला सर्वात आवडणाऱ्या भूमिकांमधल्या दोन भूमिका म्हणजे .. “कळत नकळत”मधला “मामा”
आणि “चौकट राजा” मधला ‘गणा’…हिंदी चित्रपटात सर्व नायकांपेक्षा सहज भूमिका करतांना जाणवतात ते आपले अशोकमामा.

ह्या महानायकाच्या बरोबर माझं नाव पडद्यावर बघतांना झालेला आनंद मला आजही लक्षात आहे ..
“एक उनाड दिवस” मध्ये .. “हुरहूर असते तीच उरी” ऐकणारे अशोक सराफ आणि ‘निशाणी डावा अंगठा’मधले मुख्याध्यापक … अशा काही चित्रपटात मला गाणी करता आली हे किती मोठं भाग्य ..

अलीकडच्या काळात .. श्रावणमाशी ..किंवा आनंदाने वेडेपिशे होणे म्हणत आपल्याला वेड लावणारे ‘एक डाव धोबीपछाड’ मधले अशोकमामा अजूनही पांडू हवालदार मधलीच एनर्जी घेऊन वावरतात ..

ते भेटतात तेव्हा शांत , प्रांजळ , मिश्किल पण मोजकं बोलणारे असतात .. झी ने जीवनगौरव साजरा करतांना सिद्धार्थ जाधवने इतका अप्रतिम परफॉर्मन्स केला की अशोक मामांना गदगदलेलं पाहिलं .. या आठवड्यात आमच्या सारेगमपमध्ये ते स्वतः आले आहेत ..
शूटिंग दरम्यान मला भेटून “एकदा काय झालं” साठी अभिनंदन केलं तेव्हा पाय पडलो आणि त्यांना सांगितलं .. तुम्ही भेटलात की लहानपण भेटतं .. शाळा .. कॉलेज ..साधा डोसा .. आईची सायकल .. सगळं पुन्हा भेटतं ..!!

मराठी चित्रपटाच्या इतिहासातला अत्यंत मोठा चॅप्टर आपल्याला प्रत्यक्ष भेटतो .. ही गणपतीबाप्पाची कृपा

हेही वाचा : “पंजाबी लोकांना रात्री…”, विकी-कतरिनाच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू कोणी ठरवला होता? अभिनेत्याने केला खुलासा

दरम्यान, ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आल्यावर अशोक सराफ यांचं खास स्वागत करण्यात आलं होतं. त्यांच्यावर फुलांचा वर्षावर करून सर्व लिटिल चॅम्प्सनी त्यांचे पाय धुवून त्यांचा आशीर्वाद घेतला. हे प्रेम पाहून अशोक सराफ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader