Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व दोन दिवसांनी निरोप घेणार असून बिग बॉस हिंदीचे १८ वे पर्व सुरू होणार आहे. या पर्वात कोणते स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या शोसाठी बऱ्याच कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील एका अभिनेत्रीने बिग बॉसची ६५ कोटी रुपयांची ऑफर नाकारली आहे, अशा चर्चा होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बिग बॉस १८’ चा प्रोमो रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर चाहते अंदाज व्यक्त करत आहेत की या शोमध्ये कोणते स्पर्धक दिसतील. अशातच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील दया बेनच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिशा वकानीशी (Disha Vakani) शोच्या निर्मात्यांनी संपर्क केला होता. तिला ‘बिग बॉस १८’ मध्ये भाग घेण्यासाठी ६५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण तिने ही ऑफर नाकारली आहे, असं म्हटलं जात आहे. तिला यापूर्वीही अनेकदा निर्मात्यांनी ऑफर दिली आहे.
दिशाला ‘बिग बॉस १८’ मध्ये सहभागी होण्यासाठी जी रक्कम ऑफर केली ती आतापर्यंतची सर्वाधिक होती. सध्या बिग बॉसबाबत दिशा वकानीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ‘बिग बॉस’चे निर्माते तिला स्पर्धक म्हणून घेण्यास उत्सुक होते, पण तिने शोमध्ये जाण्यास नकार दिला, असं कळतंय.
दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सुरुवातीला दयाबेनची भूमिका साकारत होती. जवळपास ९ वर्षे तिने यामध्ये दयाबेनचे पात्र साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले, पण २०१७ मध्ये तिने प्रसूतीसाठी ब्रेक घेतला. त्यानंतर ती मालिकेत परतली नाही. दिशाला पहिली मुलगी झाली, त्यानंतर तिने मुलाला जन्म दिला. सध्या ती तिच्या दोन्ही बाळांच्या संगोपनात व्यग्र आहे. निर्मात्यांनी तिला खूपदा मालिकेत परतण्यासाठी संपर्क केला, मात्र दिशा अद्याप मालिकेत परत आलेली नाही. निर्मात्यांनी इतर अनेक कलाकार सोडून गेल्यावर त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकारांना घेतलं मात्र दिशाची रिप्लेसमेंट त्यांनी अजून घेतलेली नाही.
दरम्यान, ‘बिग बॉस १८’ बद्दल ६ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही शोचा होस्ट म्हणून सलमान खान दिसणार आहे. निया शर्मा, शिल्पा शिरोडकर, अरबाज पटेल बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ते बिग बॉस हिंदीत सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.