‘बिग बॉस’ मराठीचा सीझन चार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर याचा महाअंतिम सोहळा येऊन ठेपला आहे. अशातच सुरुवातीपासूनच बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. ही स्पर्धा शेवटच्या दिवसांमध्ये चांगलीच रंगली. आता ‘बिग बॉस’ची यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याचा अंदाज सर्वजण बांधत आहेत.

‘बिग बॉस ४’चा महाअंतिम सोहळा अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर यांच्यामध्ये रंगणार आहे. यंदाची ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. पण अशातच अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने ‘बिग बॉस ४’च्या विजेत्याचं नावच सांगून टाकलं आहे.

pm Narendra modi birthday
पहिली बाजू : नरेंद्र मोदी : शासकतेतील सर्जनशीलता!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
in vanraj andekar murder case mokka against 21 accused
पुणे :वनराज आंदेकर खून प्रकरणातील २१ आरोपींवर मोक्का कारवाई
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
pune ganesh utsav
Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना
Yuvraj Singh on Father Yograj Singh Says My Father Has Mental Issues Old Video Goes Viral
Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!

आणखी वाचा : Video: रितेश देशमुखच्या प्रश्नाचं करीना कपूरने दिलं मराठीत उत्तर, म्हणाली…; व्हिडीओ व्हायरल

स्मिता गोंदकर ही ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीजनमध्ये सहभागी झाली होती. बॉसच्या पहिल्या सीझनच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये तिचा समावेश होता. आता चौथ्या सीझनमध्ये ती बिग बॉसच्या घरात गेली. पण यावेळी स्पर्धक म्हणून नाही, तर स्पर्धकांशी संवाद साधण्यासाठी ती तिथे गेली होती. तिने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्याबरोबर छान वेळ घालवला.

हेही वाचा : “आता भगव्या रंगाची ब्रा…” दीपिकाच्या बिकिनी वादावर मराठमोळ्या स्मिता गोंदकरची बोल्ड प्रतिक्रिया

‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी बिग बॉसच्या घरी स्पर्धकांना टेन्शन फ्री करण्यासाठी गेले होते. यावेळी मला प्रत्येक स्पर्धकाशी संवाद साधता आला, प्रत्येकाला जवळून अनुभता आलं. त्याचप्रमाणे बिग बॉस मधून आल्यावर मी लोकांमध्ये त्या प्रत्येकाबद्दल असलेली क्रेझही अनुभवली. माझ्या कानावर ‘बिग बॉस ४’च्या विजेत्या स्पर्धकाचं नाव पडलं ते आहे अपूर्वा नेमळेकर. या नावाचा मीही अंदाज बांधला होता आणि मला कुठेतरी वाटतंय हेच आहे.” त्यामुळे आता स्मिता म्हटल्याप्रमाणे अपूर्वा नेमळेकर ‘बिग बॉस ४’ची विजेती होते का, हे लवकरच कळेल.