अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशानी बोरुळे, सुलेखा तळवळकर, प्रतिमा कुलकर्णी, आशिष जोशी, अभिजीत चव्हाण अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘मुरांबा’ मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मुकादम कुटुंबात सतत घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतं आहेत. एप्रिल महिन्यांत ‘मुरांबा’ मालिकेने ७०० भागांचा टप्पा पूर्ण केला. अशा लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री स्मिता शेवाळेची एक्झिट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री स्मिता शेवाळेने ‘मुरांबा’ मालिकेत जान्हवीची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. पण आता तिची अचानक मालिकेतून एक्झिट झाली आहे. या एक्झिटमागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण स्मिताच्या एक्झिटमुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. “स्मिता गेली तर आता मजा नाही येणार”, असं म्हणताना दिसत आहे. तसंच काही जणांनी अंदाज लावला आहे की, स्मिता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकणार आहे. त्यामुळे तिने ही मालिका सोडली. आता हे कितपत खरं आहे? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन, कल्पना, पूर्णाआजीचं भर उन्हात शूटिंग; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

आता ‘मुरांबा’ मालिकेतील स्मिता शेवाळेची जागा ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री घेणार आहे. अलीकडे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता याच मालिकेत झळकलेली वृंदा म्हणजे अभिनेत्री मीरा सारंग स्मिता शेवाळेची जागा घेणार आहे. जान्हवी या भूमिकेत मीरा पाहायला मिळणार आहे. तिचं ‘मुरांबा’ मालिकेतील चित्रीकरण सुरू झालं असून यासंदर्भातील पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. “नवीन प्रवास सुरू करत आहे… आजवर मीराला जितकं प्रेम दिलंत तितकंच प्रेम जान्हवीला सुद्धा द्यालं, जान्हवी म्हणून मला स्वीकारालं अशी आशा नाही तर विश्वास आहे..बघत राहा ‘मुरांबा,” असं कॅप्शन लिहित तिनं पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं फोटोशूट, म्हणाली, “बालपणीचा…”

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीची ‘मुरांबा’ मालिका हिंदीत ‘स्टारप्लस’वर सुरू झाली. ‘मीठा खट्टा प्यार हमारा’, असं हिंदीतल्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहून शशांकने कलाकारांचं कौतुक केलं करत शुभेच्छा दिल्या होत्या. “व्वा आमच्या मालिकेचा रिमेक आता हिंदीत, उत्कृष्ट कलाकारांसह…खूप भारी वाटतंय. अभिनंदन,” असं लिहित शशांकने खास पोस्ट शेअर केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita shewale exit from muramba serial meera sarang played janhavi role pps