गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या वापराचं प्रमाण वाढलं आहे. हल्ली सगळेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या विविध सोशल मीडिया साईट्सवर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात चालणाऱ्या घडामोडी सर्वांशी शेअर करत असतात. कलाकारांना तर त्यांच्या कामांबद्दलची माहिती शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा आवश्यक झाला आहे. पण गेलं १ वर्ष एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री इंस्टाग्रामपासून दूर होती. आता नुकतंच इंस्टाग्रामवर पुनरागमन करत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.

अभिनेत्री स्मिता शेवाळे हिचा चाहतावर्ग मोठा आहे. गेलो अनेक वर्ष ती विविध मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिचा स्वतःचा यू ट्यूब चॅनेलही आहे आणि त्याचे १० लाखांहून अधिक सबसक्राईबर्स आहेत. पण गेलं एक वर्ष ती इंस्टाग्रामपासून दूर होती. याचं कारण म्हणजे तिला तिचं इंस्टाग्राम अकाउंट वापरता येत नव्हतं. गेल्या वर्षी नेमकं असं काय घडलं की तिला तिचंच इंस्टाग्राम अकाउंट वापरता येत नव्हतं हे तिने एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

Priyanka Chopra Praises Aaj Ki Raat song from stree 2
प्रियांका चोप्रा ‘स्त्री २’मधील ‘या’ गाण्याच्या प्रेमात; कलाकारांची स्तुती करीत म्हणाली, “तू एकदम छान, तो तर अगदी सोनं”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Bollywood theme park, Metro, mumbai,
मुंबई : चित्रपट सृष्टीचा इतिहास उलगडणार, मेट्रो मार्गिकेतील खांबांखालील बॉलीवूड थीम पार्क साकारण्यास सुरुवात
Minu Muneer
Minu Muneer : “तो खोलीत आला आणि बेडवर खेचून…”, मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा सहकलाकारांवर गंभीर आरोप!
writer Winston Groom Forrest Gump An unknown novel after the hit movie
स्मरण-टिपण: गाजलेल्या सिनेमानंतरची अपरिचित कादंबरी…

आणखी वाचा : तेजस्वी प्रकाशचं आडनाव काय? स्वतः अभिनेत्रीनेच केला खुलासा; म्हणाली, “माझं पूर्ण नाव…”

स्मिताने तिच्या यू ट्यूब चॅनेलवर एक मोठी पोस्ट शेअर केली. तिने लिहिलं, “२३ मे २०२२ ते १४ एप्रिल २०२३, जवळपास ११ महिने मी इंस्टाग्राम वर नव्हते .सुरुवातीला मला वाटलं की बरं झालं आपलं सोशल मीडियाचे एडिक्शन आहे ते ह्या मनाने सुटेल आणि त्याच विचारात पहिले तीन महिने गेले. खूप छान वाटत होतं मी लोकांना डायरेक्ट जास्त वेळ देत होते. पण पुन्हा मला instagram वर यावसं वाटलं याचं एकच कारण आहे मी अभिनेत्री आहे आणि त्यामुळे माझा येणारा प्रत्येक प्रोजेक्ट माझे चालू असलेले प्रोजेक्ट हे तुमच्यापर्यंत पोहोचावे, तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे ती कळावी. कारण एक कलाकार म्हणून आम्हाला नेहमीच आमच्या कामाची पोचपावती हवी असते.”

पुढे ती म्हणाली, “मी इंस्टाग्रामवर का नव्हते कारण मी नवीन मोबाईल घेतला आणि तो इन्स्टॉल करत असताना जुन्या मोबाईलमधून इंस्टाग्राम लॉग आऊट करायचं राहिले होते आणि त्यानंतर काहीही केल्याने माझ्या नवीन मोबाईलमध्ये इंस्टाग्राम चालूच होत नव्हतं मी माझ्या जवळपासच्या लोकांना विचारलं युट्युब वर व्हिडीओ बघितले, अनेक एक्स्पर्टची मदत घेतली तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही.”

हेही वाचा : नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘या’ महान खेळाडूचे जीवन मोठ्या पडद्यावर उलगडणार

शेवटी ती म्हणाली, “तुम्हा सगळ्यांना हेच सांगेन की आपल्यासाठी जर आपलं कोणतंही सोशल मीडिया किंवा इतर कोणतेही ॲप इम्पॉर्टंट असेल आणि जर तुम्ही डिवाइस बदलत असाल तर सगळ्यात आधी त्या अॅप मधून प्रॉपर लॉग आऊट व्हा तुमचा पासवर्ड माहिती करून घ्या आणि तो खूप सुरक्षितपणे तुमच्या नवीन नवीन मोबाईल मध्ये इंटर करा.” आता स्मिताची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून ती पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर आल्याने तिचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.